‘ही’ आहे कलावंतांसाठी गौरवसंपन्न स्पर्धा

file photo
file photo


नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालातर्फे ५९ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरी शुक्रवारी (ता.१५) सुरु होत आहे. नांदेड येथील कुसूम सभागृहात दररोज सायंकाळी सात वाजता १५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत १६ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. एकंदरीतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी ही स्पर्धा नवोदित कलावंतांसाठी गौरवसंपन्न अशीच ही स्पर्धा आहे. 


महाराष्ट्र सरकारमो १९६१ राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यामध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला, दृक्‌कला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे. त्यासाठी महाराष्ट्रात गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरांवर सर्व कलांची शिबिरे, महोत्सव, स्पर्धा असे सांस्कृतिक उपक्रम जोमाने सादर केले जातात. 

आगळा वेगळा उपक्रम

शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सर्वांत आगळावेगळा उपक्रम म्हणून दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेकडे पाहिले जाते. विशेषत: हौशी नाट्य, बालनाट्य, संगीत नाटक, संस्कृत नाटक, हिंदी नाटक व व्यावसायिक नाटके इतक्‍या व्यापक प्रमाणात आयोजित होणारी ही कलावंतांसाठी गौरवसंपन्न स्पर्धा आहे. पूर्वी या स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत करण्यात येत होते. मात्र या विभागाला या स्पर्धेचे फारसे देणघेणे नव्हते. त्यामुळे यात बदल करून या स्पर्धा सांस्कृतिक विभागातर्फे घेण्यात येतात. यावर्षीची ही ५९वी स्पर्धा होत आहे.
 
नांदेड केंद्रावर सादर होणारी नाटके
 
शुक्रवारी (ता.१५) : यश चॅरिटेबल ट्रस्ट परभणीतर्फे  ‘शेवंता जीती हाय’. 
शनिवारी (ता.१६) : ज्ञान संस्कृती सेवाभावी संस्था औरंगाबादतर्फे ‘सिस्टीम क्रॅश’. 
रविवारी (ता.१७) : संकल्प प्रतिष्ठान नांदेडतर्फे ‘आणखी एक द्रौणाचार्य’.
सोमवारी (ता.१८) : सांस्कृतिक मंच नांदेडतर्फे ‘द कॉन्शन्स’.
मंगळवारी (ता.१९) : सरस्वती प्रतिष्ठान नांदेडतर्फे ‘कळा या लागल्या जीवा’.
बुधवारी (ता.२०) :  राजीव गांधी युवा फोरम परभणीतर्फे ‘एक जांभूळ अख्यान’.
गुरुवारी (ता.२१) : नटराज कला विकास मंडळ जिंतूरतर्फे ‘वाडा’.
शुक्रवारी (ता.२२) : ललित व प्रयोगजीवी कला संकुल नांदेडतर्फे ‘पुष्पांजली’.
शनिवारी (ता.२३) : क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट परभणीतर्फे ‘अस्वस्थ वल्ली’.
रविवारी (ता.२४) : जयस्वाल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेडतर्फे ‘मत्स्यगंधा’. 
सोमवारी (ता.२५) : जय शिवराय सांस्कृतिक प्रतिष्ठान बोरी (उस्मानाबाद)तर्फे ‘आमचं जमलय, तुमचं काय’.
मंगळवारी (ता.२६) : अ.भा.मराठी नाट्य परिषद नांदेडतर्फे ‘चिऊचे घर मेणाचे’.
बुधवारी (ता.२७) : ज्ञानसंवर्धन शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ‘निळी टोपी’
गुरुवारी (ता.२८) : छत्रपती सेवाभावी संस्था उखळी (परभणी)तर्फे ‘नजरकैद’ 
शुक्रवारी (ता.२९) : बालगंधर्व सांस्कृतिक मंडळ परभणीतर्फे ‘सृजनमयसभा’
शनिवारी (ता.३०) : तन्मय ग्रुप नांदेडतर्फे ‘अंधारयात्रा’.
 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com