कोल्हापूर, मुंबईला विक्रीसाठी जाणारे राजस्थानचे बोकड मराठवाड्यात

file photo
file photo

औरंगाबाद : अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या बकरी ईद सणावर गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाचे सावट होते. यंदाही मराठवाड्यातील दुष्काळासह कोल्हापूर, सांगलीसह इतर जिल्ह्यांत आलेल्या महापुराचा परिणाम झाला आहे. यामुळे व्यवसायात 40 टक्‍के घट झाली असून, बोकड विक्रीही मंदावली असल्याचे होलसेल विक्रेते जुनेद खानी सांगितले. 

बकरी ईदला मराठवाड्यात लाखो बोकडांची विक्री होते. एकट्या औरंगाबाद शहरात ईदसाठी त्याच आठवड्यात एक लाख बकरे विक्री होतात. ईदसाठी खास राजस्थानातून बोकड मुंबईसह राज्यातील इतर भागांत विक्रीसाठी आणण्यात येत आहे. बकरी ईदसाठी बाजारात विक्रीसाठी आलेले बकरे सात हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत. हे राजस्थानातील बकरे मुंबईतील पावसामुळे आता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत विक्री करीत आहेत. दुष्काळामुळे या भागात खरेदीसाठी मात्र अल्प प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात बोकडांना आजारपण जास्त येत असल्यामुळे बकरी ईदसाठी लागणाऱ्या बोकडांची आरोग्य तपासणी करूनच खरेदी केली जात आहेत. यामुळे विक्रीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. कोल्हापूर-सांगली, सातारा या भागांतील होणारे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले आहेत. याचबरोबर मुंबई, नाशिक, पुणे या शहरांवर विक्री होणाऱ्या बोकडांच्या व्यवसायात चाळीस टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. मराठवाड्यात ईदमध्ये बोकडांच्या होणाऱ्या उलाढालीवर दुष्काळाचा परिणाम दिसून येत आहे. शहरात गेल्यावर्षीपेक्षा तीस ते पस्तीस हजार बोकड कमी विक्री होणार असल्याचा अंदाजही विक्रेत्यांतर्फ वर्तविला जात आहे. 



राज्यातील ओला आणि मराठवाड्यातील कोरडा दुष्काळाचा परिणाम बोकड व्यवसायावर जाणवत आहे. यामुळे 40 ते 50 टक्‍के व्यवहार ठप्प आहेत. यंदा होलसेलवरही यंदा "नो प्रॉफीट'च्या तत्त्वावर व्यवसाय करीत आहोत. गेल्या तीन वर्षांपासून नुकसान सहन करावे लागत आहेत. औरंगाबादेतही बोकड विक्रीवर परिणाम जाणावर आहे. 
- जुनेद खान, होलसेल, व्यापारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com