‘येथील’ सोनसाखळी चोरांना ‘अच्छे’ दिन 

file photo
file photo
Updated on

नांदेड : शहरात रस्त्यावरून पायी किंवा दुचाकीवरून जाणाऱ्या महिला असो वा पुरूष असो यांच्या गळ्यातील किंमती सोनसाखळी चोरणारी दुचाकी चोरांची टोळी सक्रीय झाल्याचे दिसुन येते. शहरातील वजिराबाद भागात एकाच्या गळ्यातील पंधरा ग्राम वजनाची सोनसाखळी लंपास केली. या वाढत्या घटनांमुळे सर्वसामान्य महिला व नागरिक भयभीत झाले असून सोनसाखळी चोरांना ‘अच्छे’ दिन आल्याची चवीने चर्चा होत आहे. 

मागील काही दिवसांपासून शहरात दुचाकी चालकांनी मोबाईल, दुचाकी व पर्स पळविण्याचा सपाटा लावला होता. आजही शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल चोरांचा हैदोस सुरुच आहे. पायी जाणाऱ्या, आठवडे बाजार करणाऱ्या किंवा ॲटोतून प्रवास करणाऱ्यांची नजर चुकवून त्यांच्या खिशातील मोबाईल लंपास करत आहेत.  यामुळे नागरिक भयभीत झाले असून या चोरांना पकडण्यासाठी पोलिसही हतबल झाल्याचे पहावयास मिळते. 

दुचाकीस्वार चोरट्यांनी डोके वर काढले

या घटना ताज्या असतांनाच पुन्हा आता दुचाकस्वार चोरट्यांनी सोनसाखळीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. पायी किंवा दुचाकीवरून जाणाऱ्यांच्या गळ्यातील किंमती सोनसाखळी, मंगळसुत्र किंवा काखेत लावलेली पर्स लंपास होण्याच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे भर बाजारात अशा घटना घडत असल्याने महिला वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. 

महाविर चौक परिसरातील घटना

शहराच्या संतकृपा मार्केटमध्ये शेतीपयोगी साहित्य घेण्यासाठी संतोष अमृतराव जाधव हे आपल्या दुचाकीवरून मंगळवारी सायंकाळी आले होते. त्यांनी आपले साहित्य खरेदी करून आपल्या दुचाकीवरुन परत महाविर चौक मार्गे जात असतांना सायंकाळी सातच्या सुमारास एका दुचावरून तोंडाला रुमाल बांधून दोघेजण (वय अंदाजे २५-३० वर्ष) गटातील तरूण त्यांच्याजवळ आले. संतोष जाधव यांच्या गळ्यातील १५ ग्राम वजनाची सोनसाखळी तोडतांना त्यांना धक्का दिला. यात ते खाली पडले. आरडा - ओरडा होईपर्यंत हे चोरटे पसार झाले. घटना घडल्याची माहिती वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप शिवले आपल्या सहकाऱ्यांसह लगेच घटनास्थळ गाठले. विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत केली. यानंतर संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

चोरट्यांचा मुसक्या आवळणार

पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी शहरातील पंचविस पोलिस चौक्या सुरू केल्या. रस्त्यावर पोलिस सतत फिरता रहावा म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. मात्र चोरटे हे ज्या परिसरात पोलिस चौकी आहे तो परिसर सोडून अन्य परिसरात अशा घटना करीत करीत आहेत. मात्र या चोरट्यांच्याही मुसक्या आवळण्यात येतील असा विश्‍वास पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी व्यक्त केला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com