नांदेड एक्स्ट्रा ‘टॉनीक’ देणारे शहर 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 11 डिसेंबर 2019

नांदेड : वर्दीतील पोलिस हा सर्वसामान्य तर सर्वसामान्य व्यक्ती हा विनावर्दीतील व्यक्ती हा पोलिस असतो. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत असतांना लोकांना सोबत घेतले तर कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही. नांदेड हे एक्स्ट्रा ‘टॉनीक’ देणारे शहर असल्याचे मत माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केले. 

नांदेड : वर्दीतील पोलिस हा सर्वसामान्य तर सर्वसामान्य व्यक्ती हा विनावर्दीतील व्यक्ती हा पोलिस असतो. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत असतांना लोकांना सोबत घेतले तर कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही. नांदेड हे एक्स्ट्रा ‘टॉनीक’ देणारे शहर असल्याचे मत माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केले. 

नांदेडच्या इतवारा पोलिस ठाण्याच्या इमारत नुतनीकरण व महिला विश्रांतीगृहाचे उद्घाटन बुधवारी (ता. ११) सकाळी श्री. लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विचारमंचावर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार, पोलिस उपविभागीय अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, आसाराम जहारवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 ही लिंक उघडून पहाVideo -‘फिटनेस’ साठी पोहण्याचा व्यायाम ‘परफेक्ट’

नांदेड हे उर्जा देणारे शहर

वीस वर्षापूर्वी मी या जिल्ह्याचा पोलिस अधिक्षक म्हणून रुजू झालो होतो. नांदेड शहरात अनेक समस्या आहेत मात्र येथील नागरिक हे शांत व मनमिळावू स्वभावाचे आहेत. पोलिस दलात चांगले काम करायचे असले तर प्रत्येक अधिकाऱ्यांनी नांदेडच्या जनतेची सेवा करावी. ते तुम्हाला कधीच विसरु शकत नाहीत. हे शहर एक्स्ट्रा टॉनीक देणारे शहर असल्याच्या भावना श्री लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केल्या. महिलांचा व महिला पोलिसांचा सन्मान पोलिस ठाण्यात व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेले विश्रांतगृह खऱ्या अर्थाने महिलांचा मान वाढविणारा आहे. त्याचा योग्य वापर करा अशा सुचना त्यांनी दिल्या. लोकांमध्ये मिसळून काम केले तर नक्कीच कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही. शेवटी त्यांनी हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेची निंदा केली. तसेच समाजबदलाची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
आयजी लोहियांचे मनोगत

आयजी मनोज लोहिया म्हणाले की, ज्या समाजात महिलांचा सन्मान केल्या जातो त्या समाजाला कोणीच विसरत नाही. पोलिस ठाण्यात येणाऱ्या महिलांचा मान सन्मान केला जावा यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. लवकरच `पोलिस दिदी’ हा उपक्रम लहान मुलांसाठी राबविण्यात येणार आहे. शहरातील सीसीटीव्ही, वाहतुक नियमन आणि अतिक्रमण यासाठी ॲक्शन प्लान तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचानांदेडात पुन्हा गोळीबार

एसपी मगर काय म्हणाले ?

पोलिस अधिक्षक श्री. मगर यांनी सांगितले की, जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर सराईत गुन्हेगारांना सळोकी पळो करून सोडले. तसेच एकाचा खात्मा केला. गोळीबाराचे प्रकार थांबविण्यास यश आले. मागील सर्वच बंदोबस्तात काम करून पोलिस ठाण्याची सुंदर इमारत व त्यात महिला विश्रांतीगृह कमी वेळात बांधले. याबद्दल त्यांनी इतवारा उपविभागाचे कौतुक केले. यासाठी विशेष पोलिस माहनिरीक्षक श्री. लोहिया यांचे मार्गदर्शन लाभले. शहरात २५ पोलिस चौक्या सुरू केल्याचे सांगत महिलांसाठी विश्रांतीगृह बांधून खऱ्या अर्थाने महिला वर्गाचा सन्मान केल्याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. 

अनेकांची उपस्थिती

यावेळी पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे, शिवाजी डोईफोडे, अनिरूध्द काकडे, पंडीत कच्छवे, अनंत नरुटे, संजय ननवरे, साहेबराव नरवाडे, एपीआय विश्‍वांभर पल्लेवाड, सुधाकर आडे, श्री. पठाण यांच्यासह डॉ. हंसराज वैद्य, डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, सुधाकर टाक, माजी महापौर अब्दुल सत्तार, शेरअली, मसुद खान, धनंजय वाघमारे, शंकर पिनोजी, डॉ. शोभा वाघमारे, डॉ. गिता लाटकर, अकबरखान पठाण आदी व्यापारी, राजकिय व सामाजीक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Extra 'tonic' city