esakal | Good News:हिंगोलीचे भूमिपुत्र कर्नल डॉ. अविनाश डुब्बेवार यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक शांती सेनेत निवड

बोलून बातमी शोधा

 कर्नल डुब्बेवाड
Good News:हिंगोलीचे भूमिपुत्र कर्नल डॉ. अविनाश डुब्बेवार यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक शांती सेनेत निवड
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : हिंगोलीचे भूमिपुत्र कर्नल डॉ. अविनाश प्रकाश डुब्बेवार यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक शांतिसेनेमध्ये निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

येथील प्रकाश डुब्बेवार ह्यांचे चिरंजीव अविनाश डुब्बेवार यांचे प्राथमिक शिक्षण हिंगोली येथे घेतल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद ( घाटी ) येथून विशेष प्रावीण्यसह एमबीबीएस पदवी प्राप्त केली. तदनंतर त्यांची भारतीय सैन्यदलातील एएमसीमध्ये कॅप्टन पदावर प्रवेश पूर्व परिक्षेतुन निवड झाली. त्यांचे आजोबा ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक स्व. सखारामजी डुब्बेवार ह्यांच राष्ट्रसेवेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्नल डॉ. अविनाश ह्यांची अहमदनगर येथे आर्मी हॉस्पिटलमध्ये २००३ मध्ये निवड झाली. त्यानंतर लखनऊ ( उत्तर प्रदेश) येथे त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केली. निरंतर कठोर, परिश्रम, जिद्द, चिकाटीने राज्यातील नाशिक (देवळाली ) येथे मिल्ट्री हॉस्पिटल येथे सेवेत असतांनाच पद्वयुत्तर शिक्षण एमडीसाठी प्रवेश परीक्षेची तयारी केली व अभिमानाची बाब म्हणजे राष्ट्रीय पातळीवर सेवारत राहून गुणवत्ता यादीतही ४३ व्या क्रमांकवर स्थान मिळवत एएफएमसी पुणे येथे एमडी स्त्री रोगतज्ञची पदवी प्राप्त केली.

हेही वाचा - महाराष्ट्राला कलंकीत करणारी घटना ! नांदेड जिल्ह्यातील 'या' गावाचा दलित समाजावर बहिष्कार; किराणा सामान, दूध आणि औषधंही बंद

तसेच विविध पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. अहमदनगर, लखनऊ ( उत्तर प्रदेश), राजौरी ( जम्मू कश्मीर), नाशिक देवळाली, पुणे, जोरहाट ( आसाम), पिथौरागढ़ (उत्तराखंड ) , व जोधपुर ( राजस्थान ) अश्या विविध मिल्ट्री हॉस्पिटल येथे डॉ. अविनाश ह्यांनी केलेल्या रुग्ण सेवेमुळेच त्यांचं नावलौकिक होऊन वेळोवेळी पदोन्नती होत राहिली. हॉस्पिटलमध्ये सेवा करतांनाच राजौरी येथे आर्मी स्कूलचे मुख्याध्यापक पद, वेळोवेळी झालेली पदोन्नती तसेच विशेष प्राविन्यासह मिळविलेल्या अनेक पदव्या व नुकतेच जोधपुर येथून सुट्टीवर हिंगोली येथे असतांना सुद्धा वाढते कोरोना संकट पाहता नाशिक देवळाली हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णाची सेवा अश्या सर्व कार्याची दखल घेत सयुंक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक शांती सेनेमध्ये सम्पूर्ण देशातून अश्या केवळ दोन उच्च विद्याविभूषित विशेषज्ञ डॉक्टरांची निवड झाली. त्यातील एक म्हणजे हिंगोलीच्या आर्य वैश्य समाजातील गौरव प्राप्त भूमिपुत्र कर्नल डॉ. अविनाश डुब्बेवार ह्यांची निवड. हिंगोलीवासीयासाठी तसेच समाज, परिवार तसेच मित्रमंडळ व सर्वासाठी अभिमानस्पद आहे. त्यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे