esakal | GOOD NEWS : हिंगोलीत तीन रुग्ण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

korona negetive

वसमत तालुक्यातील वापटी येथील कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारानंतर आलेला अहवाल  निगेटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. एका रुग्णाची भर पडली असली तरी तीन रुग्ण बरे झाल्याने हिंगोलीकरांना दिलासा मिळाला आहे. 

GOOD NEWS : हिंगोलीत तीन रुग्ण कोरोनामुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली: येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १७२ वर पोचला आहे. परंतु, शनिवारी (ता.३०) रात्री दहा वाजता आलेल्या अहवालानुसार तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने हिंगोलीकरांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ७३ रुग्ण उपचार घेत आहेत. 

शनिवारी औंढा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एका कोरोनाबाधित रुग्णाची दिवसभरात भर पडली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७२ वर पोचली.

हेही वाचाकेळी पिकाला लॉकडाउननंतर उन्हाचा फटका 

तीन रुग्ण बरे

 तसेच वसमत तालुक्यातील वापटी येथील कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारानंतर आलेला अहवाल  निगेटिव्ह आल्याने त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. एका रुग्णाची भर पडली असली तरी तीन रुग्ण बरे झाल्याने हिंगोलीकरांना दिलासा मिळाला आहे. 

हिंगोलीत बारा रुग्णांचा समावेश

सध्या कळमनुरीयेथील कोरोना केअर सेंटरमध्ये आठ रुग्ण उपचार घेत असून सेनगाव १२, हिंगोली २९, वसमत १२, जिल्हा सामान्य रुग्णालयात १२ रुग्ण उपचार घेत आहेत. यात औंढा येथील पाच, भिरडा एक, सुरजखेडा एक, सामुदाय आरोग्य अधिकारी, पहेणी दोन, माझोड एक, चोंढी खुर्द एक या रुग्णांचा समावेश आहे. 

दोन हजार २४८ रुग्ण दाखल


जिल्हाभरातील कोरोना केअर सेंटरसह जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत दोन हजार २४८ संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एक हजार ८३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील एक हजार ७५९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ४८१ रुग्ण उपचार घेत आहेत. 

३२३ रुग्णांचे अहवाल प्रलंबित


जिल्हाभरातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ३२३ कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. आता जिल्ह्यातील एकूण संख्या १७२ झाली असून त्यापैकी ९९ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आता ७३ रुग्ण उपचार घेत आहेत. 

अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडणे टाळावे

मुंबईसारख्या मोठ्या शहरांत कामानिमित्त गेलेले नागरिक आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परत येत आहेत. यात मुंबईहून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असून त्यातील कोरोनाबाधित रुग्ण निघत आहेत. त्यामुळे सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.

येथे क्लिक कराCovid-19 : वसमतमध्ये चौघे बाधित, हिंगोली जिल्ह्यात नवे पाच रुग्ण 

डॉक्‍टरांना फेसशिल्‍डचे वाटप

हिंगोली : येथील राष्‍ट्रवादी वेल्‍फेअर ट्रस्‍ट व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शासकीय रुग्णालयातील डॉक्‍टरांना फेसशिल्‍डचे शनिवारी (ता.३०) वाटप करण्यात आले. या वेळी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्‍हा परिषदेचे उपाध्यक्ष मनिष आखरे, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. किशोरप्रसाद श्रीबास, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम आदींची उपस्‍थिती होती.