Good Raid : सव्वादोन कोटीची सव्वाचार हजार ब्रास वाळुसाठा जप्त; वसमत तहसीलची कारवाई

वसमत तालुक्यात पुर्णा नदी व नाल्यातून वाळू उपसा केला जातो. या वाळूघाटांचा लिलाव झाल्यानंतर त्या ठिकाणावरुन किती वाळू उपसा केला.
वसमत वाळू साठा
वसमत वाळू साठा

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील वाळूघाटाजवळ ठेवलेला चार हजार २४८ ब्रास वाळूसाठा तहसीलदार अरविंद बेळंगे यांच्या पथकाने जप्त केला आहे. या वाळूची किंमत दोन कोटी १२ लाख रुपये असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. तालुक्यातील आजपर्यंतच्या कारवाईपेक्षा सर्वाधीक मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

वसमत तालुक्यात पुर्णा नदी व नाल्यातून वाळू उपसा केला जातो. या वाळूघाटांचा लिलाव झाल्यानंतर त्या ठिकाणावरुन किती वाळू उपसा केला तसेच वाळू उपसा करुन वाहतुकीची सर्व माहिती सादर करण्याच्या सुचना तहसीलदार अरविंद बेळंगे यांनी दिल्या होत्या. मात्र वाळू उपश्याचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारांनी माहिती सादर केलीच नाही.

हेही वाचा - आज मुंबईमध्ये अधिकृत पक्षप्रवेश पार पडला

दरम्यान, वसमत तालुक्यातील सावंगी, परळी, माटेगाव व ढऊळगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करुन साठा करुन ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार बेळंगे यांना मिळाली होती. त्यावरुन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार बेळंगे, मंडळ अधिकारी श्री. किन्होळकर, श्री. आहेरकर आदीच्या पथकाने शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी चारही ठिकाणी जाऊन पाहणी केली. यात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा असल्याचे दिसून आले.

या पथकाने माहिती घेतल्यानंतर तब्बल चार हजार २४८ ब्रास वाळूसाठा असल्याचे स्पष्ट झाले. या पथकाने वाळूसाठा जप्त करुन पंचनामा केला आहे. सदर वाळूसाठा शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. जप्त केलेल्या वाळू साठ्याची किंमत दोन कोटी १२ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. वाळूसाठा लिलाव करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव तहसीलदार बेळंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. वाळू लिलावाची परवानगी दिल्यानंतर तातडीने लिलाव केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com