परळीत गुंडांचा धुमाकूळ, अनेक वाहनांची नासधूस

परळीत गुंडांचा धुमाकूळ, अनेक वाहनांची नासधूस
Summary

रस्त्याने आडव्या आलेल्या नागरिकांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. अज्ञात गुंडांनी मोटार सायकलवरून रॉडने आणि दगड -विटांनी काचा फोडून दहशत निर्माण केली. पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

परळी वैजनाथ (जि.बीड) : शहरात Parli Vaijanath शनिवारी (ता.१२) मध्यरात्री दोन गुंडांनी धुमाकूळ घातला असून जुन्या गाव भागातील चारचाकी, तीन चाकी गाड्या, रिक्षा यांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे. शहरात Beed पोलिसांचा धाक आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील जुन्या गाव भागातील तुळजाई नगर, कृष्णा नगर, गणेशपार, अंबेवेस आदी भागांत आपापल्या घरासमोर, गल्लीत लावलेल्या गाड्यांची दुचाकीवरून आलेल्या दोन गुंडांनी लोखंडी सळ्या, राॅडच्या साह्याने रिक्षा, कार आदि वाहनांची नासधूस केली आहे. गाड्यांच्या काचा फोडून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. विशेष म्हणजे रस्त्याने आडव्या आलेल्या नागरिकांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. अज्ञात गुंडांनी मोटार सायकलवरून रॉडने आणि दगड -विटांनी काचा फोडून दहशत निर्माण केली. पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. Goons Vandalised Vehicles In Parli

परळीत गुंडांचा धुमाकूळ, अनेक वाहनांची नासधूस
औरंगाबाद हे नवीन औद्योगिक शहर बनत आहे : अमिताभ कांत

अगोदरच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रिक्षा चालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यात या गुंडांनी रिक्षाचे सर्व काच फोडून टाकल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या गुंडांना ताब्यात घेऊन कारवाई करावी व आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसान झालेल्या वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान शहरात गाजावाजा करुन सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याचा फायदा या गुंडांनी उचलला असल्याची चर्चा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com