esakal | दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांना खासदार मुंडेंकडून अभिवादन 
sakal

बोलून बातमी शोधा

दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांना खासदार मुंडेंकडून अभिवादन 

गोपीनाथ गड येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मुंडे भक्त, अनुयायी येत असतात. यंदा मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. म्हणून काही मोजक्या नेत्यांसह कन्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी सकाळी गोपीनाथ गडावर गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.

दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांना खासदार मुंडेंकडून अभिवादन 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


परळी वैजनाथ (जि. बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील गोपीनाथ गडावर खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, माजी आमदार आर. टी. देशमुख, गोविंद केंद्रे, जेष्ठ नेते रमेशराव आडसकर उपस्थित होते. यावेळी दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

गोपीनाथ गड येथे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मुंडे भक्त, अनुयायी येत असतात. यंदा मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा- जेथे एक ड्रमसाठी मोजावे लागतात पैसे तेथे ते चालवितात पाणपोई

म्हणून काही मोजक्या नेत्यांसह कन्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी सकाळी गोपीनाथ गडावर गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाचे पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. यावेळी गोपीनाथ मुंडे यांना आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी मोजकेच नागरिक, नेते उपस्थित होते. दरम्यान माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या मुंबईतील घरी परिवारासह गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. 

नंतर ११.३० वाजता फेसबुक लाईव्ह करुन मुंडे प्रेमींशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, एका पराभवाने मी खचून जाणारी नाही. गोपीनाथ मुंडे यांचे संघर्षाचे रक्त माझ्यात आहे. त्यामुळे मी खचून जाणार नाही. आणि प्रशासनाच्या विनंती मुळे मी मनावर दगड ठेवून गोपीनाथ गडावर आले नाही. मला तुमची सर्वांची काळजी आहे. मी आले असते तर तुम्ही पण आला असतात.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तो वाढू नये म्हणून मी आले नाही. यावेळी गोपीनाथराव मुंडे यांच्या बदल अनेक आठवणी त्यांनी ताज्या केल्या.सर्वांना शेअर केल्या. यावेळी गोपीनाथ गडावरचा पुण्यतिथी सोहळा सोशलमिडीयाच्या माध्यमातून सर्वांना लाईव्ह दाखवण्यात आला. 

loading image