'आई सांगायची, गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नको तुझा घात होईल'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

आई नेहमी सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नकोस, तुझा घात होईल, अशी खंत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या भगिनीने व्यक्त केली आहे. 

बीड : आई नेहमी सांगायची गोपीनाथ तू दिल्लीला जाऊ नकोस, तुझा घात होईल, अशी खंत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या भगिनीने व्यक्त केली आहे. 

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम घोटाळ्याची माहिती होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टने काल (ता.21) केला होता. त्याने पत्रकार परिषद घेऊन 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना होती असा धक्कादायक खुलासा त्याने केला होता.

या सर्व प्रकरणानंतर मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबियांनी कुठलीही अधिकृत प्रतिक्रीया देण्याचे टाळले असले तरी, त्यांच्या भगिनी सरस्वती कराड यांनी मात्र, मुंडे यांच्या शंका व्यक्त करतानाच त्यांच्या आई सांगत असलेली आठवण सांगितली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे तर आजच्या मंत्रीमंडळ बैठकीलाही गैरहजर राहिल्या असून त्यांच्याकडूनही या प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रीया आलेली नाही. 

आई नेहमी सांगायची की गोपीनाथ तू राजकारण सोडून दे, परंतु साहेब नेहमी सांगायचे की मला समाजकारण करायचे आहे, यासाठी मी एवढा संघर्ष केला आहे अन् आता राजकारण सोडून दिेले तर कसे होईल, असेही मुंडेच्या भगिनी कराड यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Gopinath Mundhes Sister Statement on munde murder mystery