esakal | अवैधरित्या कत्तलीसाठी नेणाऱ्या २१ जनावराची सुटका, गोरेगाव पोलिसांची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

सेनगाव: अवैधरित्या कत्तलीसाठी नेणाऱ्या २१ जनावराची सुटका

सेनगाव: अवैधरित्या कत्तलीसाठी नेणाऱ्या २१ जनावराची सुटका

sakal_logo
By
सीताराम देशमुख

गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत गुप्त माहिती आधारे चार टेम्पो मधून, अनेक जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी नेत असल्याची माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी ता. १३ भल्या पहाटे सापळा रचून चार टेम्पो व त्यांचे चालक यासह २१ जनावराना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केल्याने पशुपालकात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा: 'इसापूर'चे दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आज भल्या पहाटे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली आहे. गोरेगाव नजीक चौफुलीवर सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या पथकाने दोन टेम्पो पकडले आहेत. पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी सुद्धा पथकं कर्मचारी घेऊन वाशिम ते हिंगोली महामार्गावर कनेरगाव नाका येथे तळं ठोकून तैनात होते.

पोलिस चौकी पासून काही अंतरावर दोन टेम्पो हे जनावरांना हिंगोली कडे जाणारे दोन पिक-अप पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या टेम्पोमध्ये अत्यंत निर्दयीपणे कोंबून असलेले तब्बल एकवीस बैल आढळून आले आहेत. यापैकी अनेक बैल हे जखमी झालेल्या अवस्थेत आढळले आहेत. हि जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

याप्रकरणी पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार हे दोन पिकअप ज्याचा नंबर एम.एच २९ बी इ झिरो ३१ तर दुसरा पिकप एम.एच ३७ टी ३५७ पिक अप क्रमांक एम.एच ३७ जे १०२७ असून पिकअप क्रमांक चार एम.एस ३७ जे १४५० असे एकूण चार पिकअप यापैकी दोन काजळेशवर ता.कांरजा जिल्हा वाशिम येथील रियाज अहेमद अब्दूल नबी, आणि अब्दुल रफिक शेख लाल रा. काजळेशवर ता.कारंजा जिल्हा वाशिम हे दोघे जण काजळेशवर वरुन हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथे नेत असताना पकडण्यात आले आहे असे पोलीसांनी माहिती दिली.

तर दोघेजण मंगरुळपीर तालुक्यातील अकील जावेद मोहम्मद जिया व अब्दुल संजीद शेख उमर रा. मणभा कारंजा येथील रहिवासी असलेल्या यांनी ही जनावरे कत्तलीसाठी हिंगोली येथे नेताना पकडून गोरेगाव पोलिस ठाण्यात आणले व त्या २१ बैलांना मोकळे करून त्यांना जिवदान देण्यात आले आहे .

पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील व पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.

कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असून जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या मुख्य सुत्रधार कोण याचा शोध घेतला जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील व पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी सांगितले आहे.

गावातील नागरिकांनी जनावरांना बघुन त्या भुकेनं हापालेल्या बैलांना चारा दिला. दरम्यान या पथकात जगन गायकवाड, इम्रान पठाण, राजू हमने, दिलीप खिलारी, श्याम उजगरे, विजय महाले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली.

loading image
go to top