esakal | 'इसापूर'चे दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

इसापूर धरण

'इसापूर'चे दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जि.हिंगोली) : इसापुर धरणामध्ये (Isapur Dam) उपलब्ध झालेला ९८.५१ टक्के पाणीसाठा व धरणाच्या पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या बंधाऱ्यामधून होत असलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता इसापूर प्रकल्प प्रशासनाने सोमवार (ता.१३) धरणाचे दोन दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात ३८.९१२ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दिवसात झालेला पाऊस व पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या जयपूर बंधारा व त्यावरील भागात असलेले (Kalamnuri) अकरा बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्या गेली आहेत. त्यामुळे या बंधाऱ्यामधून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यातच जयपुर बंधाऱ्यामधून सद्यःस्थितीत ५४.६६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदी (Painganga River) पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इसापूर धरणाच्या मंजूर प्रचलन आराखड्यानुसार धरणांमधील पाणीपातळी १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ४४०.८५ मिटरपर्यंत ठेवणे अपेक्षित असताना.

हेही वाचा: परभणी जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली

आज मितीस धरणाची पाणी पातळी ४४०.८५ मिटरपर्यंत पोहोचली असून पाणीसाठा ९४९.७५ दलघमी एवढा झाला आहे. याची टक्केवारी ९८.५१ टक्के झाली आहे. त्यातच पाणलोट क्षेत्रामधील बंधाऱ्यामधून होत असलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता इसापूर धरणाच्या मंजूर प्रचलन आराखड्यानुसार धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा कायम ठेवून येणाऱ्या पाण्याची आवक पाहता प्रकल्प प्रशासनाने सोमवारी धरणाचे दोन दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात ३८.९१२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला आहे. त्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान धरणाच्या दोन दरवाजामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असताना धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून पाण्याचा विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ईसापुर धरणांमधून पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात आल्यानंतर निर्माण होणारी पूर सदृश्य परिस्थिती पाहता इसापूर प्रकल्प प्रशासनाने कार्यक्षेत्रातील यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्हा अंतर्गत असलेल्या कळमनुरी, पुसद ,उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट येथील तालुका दंडाधिकार्‍यांना नदी काठावरील गावांना सूचना देण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे.

loading image
go to top