भाजप सरकारला टेकूची गरज नाही - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

लातूर - भारतीय जनता पक्ष व शिवसेना या दोन्ही पक्षांनी काही निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढल्या आहेत. असे असले तरी सरकार कायम आहे. सध्याचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करील. आम्हाला कोणाचा टेकू घेण्याची गरज नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी येथे बुधवारी (ता. आठ) पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

राज्यात 25 जिल्हा परिषदा व दहा महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या सर्वच ठिकाणी भाजपने उमेदवार दिले आहेत. मी राज्यभर दौरा करीत आहे. पक्षाच्या दृष्टीने वातावरण चांगले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळेच नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप हा एक नंबरचा पक्ष राहिला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही पक्ष नंबर एकवरच राहील. लातूर जिल्हा परिषदेवरही भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास श्री. दानवे पाटील यांनी व्यक्त केला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांनी काय भूमिका घ्यायची हे त्यांनी ठरवावे. कॉंग्रेसमुक्त राज्य करणे हे आमचे ध्येय आहे. त्या दृष्टीने कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या निवडणुकीत प्रत्येक नेत्याच्या हस्ते प्रचाराचा प्रारंभ केला जात आहे, असे श्री. दानवे पाटील एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. 

अजित पवारांना गांभीर्याने घेत नाही 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल दोन दिवसांपूर्वी एक विधान केले होते. त्यावर श्री. दानवे पाटील म्हणाले, ""अजित पवार यांचे विधान आम्ही गांभीर्याने घेत नाही. त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. दिवंगत नेते मुंडे यांनी आमच्यासारख्या तळागळातील कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी दिली आहे. ते नसताना आरोप केले जात आहेत. त्याला आम्ही किंमत देत नाही.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government does not need the backing of the BJP