राफेल विमानांची संख्या कमी करुन किंमत केली तिप्पट - पृथ्वीराज चव्हाण

सुषेन जाधव
रविवार, 16 डिसेंबर 2018

औरंगाबाद - राफेल विमानांची संख्या कमी करुन त्यांची किंमत तिप्पट केली जाते. ही प्रक्रिया अपारदर्शक आहे. याची चर्चा झाली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. रविवारी (ता.16) एमजीएमच्या रुक्‍मिणी सभागृहात "राफेल विमान खरेदी ः भ्रम आणि वास्तव' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादाचे फ्रेंड्‌स ऑफ डेमोक्रसी आणि युथ फॉर डेमोक्रसी यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते. 

श्री. चव्हाण म्हणाले, जगातील लोकशाही देशांमध्ये शस्त्रास्त्रे खरेदी किंमत जाहीर केली जाते. मात्र, आपल्या देशात गोपनीयतेच्या नावाखाली राफेल खरेदीची किंमत लपविली जाते. संरक्षण खरेदी परिषदेला बाजूला सारुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण उपसमिती राफेलच्या किंमतीत वाढ करते यास तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा विरोध होता. नेमके खरेदी बाबत काय घडले हे पर्रीकर यांनी सांगण्यासाठी जनतेसमोर यायला हवे. युपीए सरकारने दहा वर्ष राफेल खरेदीला का विलंब केला? हा आरोप केला जातो. तो चुकीचा आहे. युपीएने 2008 मध्ये याबाबत प्रक्रिया सुरु केली होती. राफेल खरेदी हा आतापर्यंत जगातील संरक्षणविषयक सर्वात मोठा व्यवहार असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: government increase Rafale aeroplane prices says Prithviraj Chavan