Umarga Crime : सरकारी वकिलाला जबर मारहाण करुन अनोळखी व्यक्तींनी केली लुटमार

उमरगा बाह्यवळण मार्गावर घडला प्रकार
Crime
Crimeesakal

उमरगा (जि. धाराशिव) - येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयातील शासकिय अभियोक्ता (सरकारी वकिल) यांना दोन अनोळखी व्यक्तींनी उमरगा बाह्यवळण मार्गावर जबर मारहाण करून, त्यांच्याकडील रोख रक्कम व दोन मोबाईल हिसकावुन लुटमार केली. बुधवारी (ता. सहा) रात्री झालेल्या या घटनेचा शुक्रवारी (ता. आठ) फिर्याद प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

या बाबतची प्राप्त माहिती अशी की, सरकारी वकिल अ‍ॅड. संदिप देशपांडे बुधवारी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान कारने (क्र. एम एच २५ बी ए ०९९७) बालाजी सुरवसे यांच्या सीएनजी पंपाकडे जात होते. अत्तार पेट्रोल पंपापासुन जवळ असलेल्या पुलाजवळे लघुशंकेसाठी थांबुन परत जात असताना एक २५ वर्षीय अनोळखी व्यक्ती तोंडाला काळा मास्क बांधुन तेथे आला, त्याने मला सोलापूरला सोडता का असे हिंदी भाषेत बोलला.

अ‍ॅड देशपांडे यांनी त्याला नकार दिल्यानंतर त्या व्यक्तीने हाताच्या मुठीने डोळ्यावर मारहाण केली. पुन्हा जबड्यावर मारहाण केली. त्याच क्षणी दुसऱ्या व्यक्तीनेही  मारहाण सुरुवात केली. त्या व्यक्तींनी रक्कमेची मागणी करून पंधरा हजार किंमतीचे दोन्ही मोबाईल आणि दहा हजार रुपये हिसकावुन घेतले. गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करुन अ‍ॅड. देशपांडे यांना रस्त्याच्या बाजुच्या खड्डयात ढकलले. आणि कार पळवुन नेली.

या घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर अ‍ॅड. प्रविण तोतला यांनी पोलिसांना माहिती दिली. मोबाईलच्या संभाषणामुळे कार दाळींबजवळच्या स्मशानभूमी जवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, पोलिस निरीक्षक डी. बी. पारेकर यांच्यासह पोलिस कर्मचारी तेथे गेले. अ‍ॅड. देशपांडे यांनी घरातील दुसरी चावी घेऊन कार सुरू केली.

त्या व्यक्तींनी कारमधील कागदपत्रे अस्तावस्त टाकली होती. दरम्यान या घटनेमुळे मानसिक धक्का बसल्याने अ‍ॅड. देशपांडे यांनी शुक्रवारी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर तपास करीत आहेत.

विधीज्ञ मंडळाने केला घटनेचा निषेध

जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. संदीप देशपांडे यांच्यावर  प्राणघातक हल्ला करून, त्यांच्या जवळील रोकड, मोबाईल, ऐवज लुटून त्यांची नवीन कार पळवून नेली या घटनेचा उमरगा विधीज्ञ मंडळ तीव्र निषेध केला आहे, हल्लेखोरांचा तपास करून कठोर कारवाई करण्यात यावी व हल्लेखोरांची न्यायालयीन पैरवी भविष्यात विधीज्ञ मंडळाच्या कोणत्याही सदस्यांनी करू नये असा ठराव गुरूवारी (ता. सात)  सर्वानुमते घेण्यात आला.

विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अक्षय तोतला, सचिव अ‍ॅड. प्रविण पाटील, खजिनदार अ‍ॅड. डी. एम. कातपुरे यांच्यासह विधीज्ञ मंडळी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com