esakal | सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करतयं, संभाजी निलंगेकरांची टीका | Sambhaji Nilangekar In Latur
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Nilangekar

सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करतयं, संभाजी निलंगेकरांची टीका

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्याचे खरीप हंगामातील सर्व पिके उद्ध्वस्त झाले आहेत. अशा संकटाच्या वेळी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज होती. मात्र हे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असून जोपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही तोपर्यत स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी रविवारी (ता.दहा) कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला. येथील मंगल कार्यालयात अन्नत्याग आंदोलन 72 तास या आंदोलन पूर्वी निलंगा येथे आयोजित बैठकीत ते बोलत (Latur) होते. यावेळी भाजप (BJP) प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, दगडू सोळुंके, विरभद्र स्वामी, मिलिंद लातूरे, व्यंकट धुमाळ, काशीनाथ गरीबे, मंगेश पाटील, सभापती राधा बिराजदार आदी उपस्थित होते.

हेही वाचा: निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस, दोन शेतकरी गेले वाहून

निलंगेकर म्हणाले की, राजकारणात काम करत असताना किती मोठ्या पदावर गेलो तरी जणतेचा कार्यकर्ता म्हणून काम करावे ही भावना पदाधिकाऱ्याने ठेवावे राजकारणात सत्ता येते जाते. मात्र सत्तेच्या काळात व सत्ता नसलेल्या काळात कोण कार्यकर्त्यांसोबत रहातो ही खरी परिक्षा असते असे सांगून पदाधिकाऱ्यांनी जमिनीवर रहावे असा सल्ला दिला. अतिवृष्टीने मांजरा व तेरणा काठावरील शेतकऱ्यांचे पुराने मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांची चेष्टा केली जात आहे. आमच्या काळात एका गावचा पंचनामा म्हणजे गावचा पंचनाममा करून भरपूर मदत मिळवून दिली होती. या सरकारने सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करून सोमवार (ता.11), मंगळवार (ता.12) व बुधवार (ता.13) असे तीन दिवस लातूर येथील शिवाजी चौकात जिल्ह्यातील ७२ शेतकरी ७२ तास अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. एवढे करूनही सरकारला जाग येत नसेल तर १६ ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेला या सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी पदयात्रा काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: औरंगाबादेत भाजपतर्फे १२ ऑक्टोबरला ओबीसींचा विभागीय मेळावा

लवकरच विधानभवनावर मराठवाड्यातील हजारो शेतकरी घेऊन व सोयाबीन पेंडीसह मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेट देणार असल्याचा इशारा दिला. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान निलंगेकर यानी केले. सिंहासन हे आमचे ध्येय नसून संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कठोर पावाले उचत जेलभरो आंदोलन करू व सरकारला नुकसानभरपाई देण्यास भाग पाडू असा सज्जड दम त्यानी दिला. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा एक रूपयाही लातूर जिल्ह्याला मिळाला नाही. याची खंत त्यांनी व्यक्त करत पालकमंत्री निष्क्रिय असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. कारण शेतकऱ्यांच्या व्यथाची जाणीव नसलेला हा पालकमंत्री आहे अशी टीका अमित देशमुख यांच्यावर निलंगेकर यांनी केली.

loading image
go to top