तातडीने मदतीसाठी सरकार प्रयत्नशील - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान भरून निघण्यापलीकडचे आहे. अटी, शर्ती, नियमांना फाटा देत शक्‍य होईल तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यास सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी मानसिकदृष्ट्या खचू नये, अशा शब्दांत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

नायगाव (जि. नांदेड) - परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान भरून निघण्यापलीकडचे आहे. अटी, शर्ती, नियमांना फाटा देत शक्‍य होईल तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यास सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांनी मानसिकदृष्ट्या खचू नये, अशा शब्दांत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्‍यातील कहाळा, सोमठाणा, गडगा व मांजरम येथील नुकसानग्रस्त पिकांची खोत यांनी सोमवारी पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. 

खोत म्हणाले, की परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांनी धीर सोडता कामा नये. कुटुंबात आपल्यावर अवलंबून असलेल्यांच्या भल्यासाठी या संकटाशी दोनहात करणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government will seek immediate help sadabhau khot