Haribhau Bagade : भारतीय संस्कृती, शिक्षण पद्धती हा आपला ठेवा! राज्यपाल बागडे : ‘अभाविप’च्या अधिवेशनाचे उद्घाटन
Latur News : राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी ‘अभाविप’च्या अधिवेशनाचे उद्घाटन करत भारतीय संस्कृती आणि शिक्षण पद्धतीचे महत्त्व सांगितले. त्यांनी भारतीय संस्कृतीला वाव देणाऱ्या शैक्षणिक धोरणाची प्रशंसा केली.
लातूर : भारतीय संस्कृती, शिक्षण पद्धती हा आपला ठेवा आहे. ही संस्कृती लोप पावावी म्हणून मॅकेलेची शिक्षण पद्धती आली. त्यामुळे आज नव्या पिढीला जीवनात देश-मातृभूमी सर्वप्रथम असते, असे सांगण्याची वेळ आली आहे.