जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाविरूध्द 27 मतांनी अविश्वास ठराव मंजूर; जिल्ह्यातील पहिलीच घटना

भगवंत सुरवसे
Saturday, 23 January 2021

ग्रामसभेसाठी ५८९ मतदारांनी सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यत नोंदणी केली व गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले

नळदुर्ग (उस्मानाबाद): उस्मानाबाद जिल्ह्यातील  मानेवाडी ( ता.तुळजापूर ) येथील सरपंच शांताबाई बापू सगट व उपसरपंच मनोहर यशवंत माने यांच्या विरोधचा अविश्वास  ठराव गुरूवार ता.२१ रोजी ग्रामसभेत मंजूर झाल्याने खळबळ उडाली आहे. 

मानेवाडी ता. तुळजापूर येथील ग्रामसदस्यानी सरपंच व उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वासाबाबत तहसीलदार तुळजापूर यांच्याकडे ता.७ ऑगस्ट २०२० रोजी केलेल्या अर्जानुसार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ता.१३ ऑगस्ट रोजी अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. त्यात ७ सदस्यांपैकी ६ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने ६/१ या मताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

संदीप क्षीरसागरांची आघाडी बीड नगरपालिकेत घायाळ झाली का? काकांच्या गटाकडे सर्व समित्या |

माञ याला आव्हान देत जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंचांनी तक्रार दिल्याने त्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी ग्रामसभा बोलावून अविश्वास ठरावावर गुप्त मतदान घेण्याचा आदेश ३१ डिसेबर २०२० रोजी दिला. त्यानंतर ता. २१ जानेवारी  रोजी गटविकास अधिकारी  प्रशांतसिह मरोड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन ग्रामसभेसाठी ५८९ मतदारांनी सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यत नोंदणी केली व गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले.

सरपंच शांताबाई बापू सगट यांच्या विरोध अविश्वास ठरावाच्या बाजूने ३०० मतदारांनी तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध २७२ मतदारांनी मतदान केले. तर १४ मतदान अवैध झाले असे एकूण ५८७ मतदारांनी मतदान केले. २७ मतांनी सरपंच शांताबाई सगट यांचा अविश्वास ठराव मंजूर केला, असल्याची घोषणा मतदानधिकारी तथा गटविकासधिकारी प्रशांतसिंह मरोड यांनी जाहिर केले. तसेच उपसरपंच मनोहर यशवंत माने यांच्या आविश्वास ठरावावरही गुप्त मतदान घेण्यात आले नोंदविलेली मते ५८७ अविश्वास ठरावाच्या बाजूने ३०२ तर अविश्वास ठरावाच्या विरुध्द बाजूने २७५ तर  १० मते अवैध ठरली.

शेतात पाच मोरांचा मृत्यू, बीडमधील लोणी शिवारात खळबळ

उपसरपंच मनोहर यशवंत माने याच्याविरुद्धचा अविश्वास ठराव २७ मतांनी मंजूर करण्यात आल्याची घोषणा निवडणूक अधिकारी प्रशांतसिह मरोड यांनी केली. अविश्वास ठराव आणणारे सदस्य प्रमुख शहाजी हाके व इतर सदस्य महावीर सगट, स्वाती माने, विजया देवकर, कविता हाके, शालू बाई बरवे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोश केला.

( edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election result naldug sarapanch news usmanabad political news