
तालुक्यात सुरू असलेल्या 55 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे
उदगीर (उस्मानाबाद): तालुक्यात सुरू असलेल्या 55 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची पोलिस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तालुक्यातील संवेदनशील मतदार केंद्राच्या ठिकाणी ग्रामीण पोलिसांनी सोमवारी (ता.११) संचलन करून शांततेत मतदान पार पाडण्याचे आवाहन केले.
तालुक्यातील या 55 ग्रामपंचायतींपैकी संवेदनशील मतदार केंद्र असलेल्या निडेबन, दावणगाव, लोहारा, हेर, कुमठा व वेल्हाळ या गावात पोलिस विभागाने संचलन केले. या मतदानाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अनुसूचित घटना घडू नये याविषयी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
शेतकरी कुटुंबांनी केली काळ्याआईची पूजा; बैलगाडीतून प्रवास
यावेळी उदगीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, ग्रामीण पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक घारगे उपस्थित होते यावेळी आरसीबीचे एक पथक, ग्रामीण व शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, होमगार्ड असे जवळपास पन्नास ते सत्तर कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यासह संचलन केले.
मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा
या संचलनामुळे गावांतील निवडणूक प्रक्रियेला आला आहे. शिवाय होणाऱ्या गैरप्रकारावर निर्बंध येणार आहेत. एकदम एवढे पोलिस गावामध्ये रस्त्यावरून संचलन करत असल्याचे पाहून ग्रामस्थांतही आश्चर्य निर्माण झाले होते. या संचलनासाठी पोलिस जमादार शिवाजी केंद्रे, नामदेव सारूळे, तुळशीदास बरुरे, चंद्रकांत कलमे, राहुल गायकवाड, नानासाहेब शिंदे आदींनी पुढाकार घेतला.
(edited by- pramod sarawale)