कोरोनाच्या भितीपेक्षा निवडणूकीची धाकधूक वाढली! 38 ग्रामपंचायतीसाठी 752 उमेदवार रिंगणात

अविनाश काळे
Tuesday, 5 January 2021

सोमवारी 453 जागेसाठी पात्र ठरलेल्या एक हजार 242 नामनिर्देशनपत्रापैकी 403 जणांनी माघार घेतली

उमरगा (उस्मानाबाद) : तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीपैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत. आता 38 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत 752 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. कोरोनाचा विळखा सैल झाल्याने निवडणूक कार्यालयात गर्दी झाली, कोरोनाच्या भितीपेक्षा निवडणूकीचीच धाकधूक इच्छुक उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

सोमवारी 453 जागेसाठी पात्र ठरलेल्या एक हजार 242 नामनिर्देशनपत्रापैकी 403 जणांनी माघार घेतली. 140 जागा बिनविरोध असून अनुसूचित जमातीच्या 8 जागा रिक्त असून 305 जागासाठी 752 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आता उमेदवार दंड थोपटून पाठ लावण्यासाठी मतदारराजाच्या उंबरठ्यापर्यंत जाण्याची तयारी सुरू केली आहे.

Gram Panchayat Election: उदगीरमध्ये 61 ग्रामपंचायतीसाठी 1205 उमेदवार निवडणूक रिंगणात

दरम्यान मुळज, बलसूर, भिकार सांगवी, जकेकूर, जकेकूरवाडी, एकोंडी (जहागीर), कोळसूर (गुंजोटी), पळसगांव, चिंचकोटा, मातोळा, बाबळसूर या ग्रामपंचायती बिनविरोध आल्या आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत गुरुवाडी, नागराळ, तलमोड ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. निवडणूक निरीक्षक श्री. काकडे, तहसीलदार संजय पवार, नायब तहसीलदार विलास तरंगे, नंदकिशोर मल्लूरवार आदींनी निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

दहा ग्रामपंचायती बिनविरोध; राजकारणाचे केंद्र असलेली मुळज ग्रामपंचायत बिनविरोध

752 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात-
गावनिहाय निवडणूक रिंगणात असलेले एकूण उमेदवार, कंसात एकूण जागा : सावळसुर - १४ ( सात ), कदमापूर / दुधनाळ -१६ (सात), कदेर- ४१ (११), तुरोरी ४३- (१७), व्हंताळ - १८ (नऊ), दाळींब - ४२ (१७), तलमोड- २१ (११), बेडगा- १८ (नऊ), पेठसांगवी - ३३ (एकुण १३ तीन बिनविरोध),  कोळसूर कल्याण - १३ (एकुण सातपैकी एक बिनविरोध), कराळी - २९ (नऊ), कवठा - २७ (११), समुद्राळ - १९ (सात), नाईचाकूर- ३६ (१३), दाबका- २१ (सात), कुन्हाळी - २९ (११), वागदरी - २० (सात), रामपूर - २४ ( नऊ), जगदाळवाडी - १६ (सात), गणेशनगर - १४ (सात), दगडधानोरा/मानेगोपाळ - २१ (नऊ), काळानिंबाळा - २२ (नऊ), सुपतगांव - २४ ( नऊ), गुगळगांव -  १८ ( नऊ), हिप्परगाराव- दोन (नऊपैकी सहा जागा बिनविरोध, दोन रिक्त), गुंजोटी - ५० (सतरा), नाईकनगर मुरूम - दोन (सातपैकी सहा जागा बिनविरोध), बोरी - आठ (सातपैकी तीन जागा बिनविरोध), मूरळी -१४ (सात), नागराळ गुंजोटी - दोन (सातपैकी पाच बिनविरोध, एक रिक्त), जवळगा बेट - १३ (नऊ पैकी दोन बिनविरोध), आष्टा जहागीर - सहा (सातपैकी चार बिनविरोध), डिग्गी- दहा (अकरा पैकी चार जागा बिनविरोध, दोन रिक्त), कडदोरा - १४ ( सात), थोरलेवाडी - १४ (सात), हंद्राळ - १३ (सहा, एक जागा रिक्त ), भगतवाडी - १८ (नऊ), गुरुवाडी - सहा (सातपैकी चार बिनविरोध). 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election Umarga Usmanabad political news