हिंगोली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा झेंडा. ग्रामपंचायत निवडणुकीत निर्विवाद बहुमत

टीम ई सकाळ 
Monday, 18 January 2021

डॉ. चित्रा अनिल कुर्हे या स्विडन येथून खास ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गावात आल्या व त्यांच्या पँनलचा दणदणीत विजय झाला.

हिंगोली :- तालुक्यातील डिग्रस वाणी ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनल चा नऊपैकी आठ जागेवर दणदणीत विजय मिळविला विजयी उमेदवार डॉ. चित्रा अनिल कुर्हे या स्विडन येथून खास ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गावात आल्या व त्यांच्या पँनलचा दणदणीत विजय झाला.

हेही वाचा - हातात कत्ती, चाकू घेऊन व्यापाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न;...

डॉ. चित्रा या व अनिल कुर्हे या पती पत्नीने पँनल उभारुन नऊ पैकी आठ जागेवर विजय मिळाला आहे. यात डॉ. चित्रा, अनिता रमेश आडळकर, सुभाष किसन खंदारे, उज्वला काशिनाथ नायकवाल, हिम्मत खंदारे मीना संतोष वसेकर सुनिता खंदारे साळूबाई गौतम पाईकराव हे उमेदवार विजयी झाले. 

विजयी उमेदवाराचे डॉक्टर सुदाम खंदारे, रामदास खंदारे नंदकिशोर आढळकर, सिद्धार्थ खंदारे चांदोजी खंदारे ,भारत जिरवणकर गौतम खंदारे, भास्कर कुरे, हर्षवर्धन कांबळे ,आशुतोष पाईकराव, मनोहर कांबळे, सुभाष खंदारे ,सखाराम कांबळे, लिलाबाई खंदारे  यांचा समावेश आहे. गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

नक्की वाचा - आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी राखला गड; पाथरवाला, कुरण...

दरम्यान डॉ. चित्रा यांना पाच भाषा अवगत आहेत. स्विडन येथून हे दाम्पत्य गावात आल्यावर त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेत गावकऱ्यांच्या विकास कामासाठी पुढाकार घेऊन कामे केली. ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होत पँनल तयार करून आठ जागेवर दणदणीत विजय मिळविला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Elections Vanchit bahujan aaghadi wins in Hingoli district