esakal | सहा हजार गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

कोरोना आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र शासनाच्या योजना गावपातळीवर कधी पोहचतील याचा नेम नाही. कामठ्याच्या गावकऱ्यांनी मात्र केंद्राच्या व राज्याची योजना पोहचेल तेव्हा पोहचेल पण, त्यापूर्वीच गावकऱ्यांच्या आरोग्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे. यासाठी कामठा गावच्या ग्रामपंचायत संदस्यांनी मिळुन दोन हजारापेक्षा अधिक कुटुंबातील सदस्यांना हात धुण्यासाठी साबन व तोंडाला बांधण्यासाठी मास्कचे वाटप करुन जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे.

सहा हजार गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. कामठा बु. ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. जिने गावकऱ्यांच्या पुढाकाराने गावातच ‘हायपोक्लोराइड’ सोलुशन तयार करून त्याची गावात फवारणी करण्यात येत आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छ्ता करण्यात येत आहे. शिवाय गावातील सर्व कुटुंबातील सदस्य यांना मोफत मास्क व हात धुण्यासाठी एक साबण वाटप करण्यात येत आहे.

यासाठी कामठा गावाचे सरपंच शिवलिंग स्वामी, उपसरपंच प्रभु पाटील, सोसायटी चेअरमन सोमवारे, पंचायत समिती अर्धापूरच्या माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य मंगलताई स्वामी, पंचायत समिती विस्तार अधिकारी एस. आर. मोटरवार, श्री. मुडकर, डॉ. एस. पी. गोखले, आरोग्य उपकेंद्र कामठा समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. बनसोड, ग्रामविकास अधिकारी यु. एम. देशमुख, श्रीमती काळे, श्रीमती खुळे, आरोग्य कर्मचारी माकु, तलाठी श्री. भूरेवार, अगनवाडी सेविका योजना केदारे, नंदा कांबळे, संगिता दासे, आशा, ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी गव्हाणे  हे सर्वजन एकत्र आले.

हेही वाचा- तिन्ही शासकीय रुग्णालयात दोनशे आयसोलेशन वार्ड

‘हायपोक्लोराइड’ सोलुशन ​

गावात कोरोना सारखा जिवघेणा आजार यायलाच नको म्हणून आरोग्याच्या दृष्टीने काहितरी केले पाहिजे असा विचार केला आणि गावातील प्रत्येक कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा ठराव केला. त्या दृष्टीने वाटचाल करत कोरोनाला हरवण्यासाठी ‘हायपोक्लोराइड’ सोलुशन तयार केले. त्यासोबत हात धुण्यासाठी साबण आणि तोंडाला लावण्यासाठी मास्कची व्यवस्था करुन ते प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचती केले आहे.

हेही वाचा- मुक्त संचारामुळे लॉकडाउनच्या उद्देशाला हरताळ

लोकसहभागातून  प्रतिबंधात्मक उपाययोजना
सध्या कामठा गावात एक हजार २८८ इतके कुटुंब आहे तर, सहा हजार ३९८ इतकी गावची लोकसंख्या आहे. या सर्वांचे कोरोनापासून आरोग्य निरोगी रहावे यासाठी स्वतः ग्रामपंचायतने पुढाकार घेणारी तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणारी ग्रामपंचायत ठरली आहे. त्यामुळे गावातील लोकांमध्ये एक नवचैतन्य व मनोधैर्य वाढले आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतला आदर्श व दिशा देणारी ग्रामपंचायत ठरली आहे.

 
loading image