विद्यमान सरपंचाला शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले! मुरमा येथे सरपंचपदी रोजगार सेवकाची पत्नी

मुरमा (ता.पैठण) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचाविरुद्ध गावाचे सिंहासन ताब्यात घेण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये ग्रामरोजगारसेवकाने आपले गट उभे करून पत्नीसह पाच जणांना निवडून आणले
विद्यमान सरपंचाला शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले! मुरमा येथे सरपंचपदी रोजगार सेवकाची पत्नी

पाचोड : गेल्या दहा वर्षापासून मुरमा (ता.पैठण) येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचाविरुद्ध गावाचे सिंहासन ताब्यात घेण्यासाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये ग्रामरोजगारसेवकाने आपले गट उभे करून पत्नीसह पाच जणांना निवडून आणले, मात्र सरपंच पदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्गा (ओबीसी)स सुटल्याने पत्नीची सरपंच पदाची संधी हुकली,

अन् उपसरपंच पदाची माळ गळ्यात पडली. परंतु तीन वर्षानंतर विद्यमान सरपंचाला त्यांच्या पतीने शासकीय जमिनीवर केलेल्या अतिक्रमणामुळे जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविल्याने सरपंचपदाची नामी संधी मिळाली असून पत्नी सरपंच तर पती ग्रामरोजगारसेवक म्हणून कामकाज सांभाळू लागले आहेत.

मुरमा येथील ग्रामपंचातमध्ये ग्रामरोजगार सेवकाची जबाबदारी सांभाळणाऱ्या दिनकर मापारी यांनी ग्रामपंचायतचे कामकाज जवळून पाहीले. अन् हळुहळू त्यांनी ग्रामस्थांचे मनं जिंकत फेब्रुवारी २०२१ च्या निवडणूकीत मातब्बर सरपंचाविरुध्द आपले पॅनेल उभे करून पत्नीसह सात उमेदवार रिंगणात उतरविले.

दिनकर मापारी हे दिव्यांग व मितभाषी असल्याने मतदारांनी त्यांच्या गटास कौल दिला.अन् त्यांच्या गटातुन त्याच्या पत्नी उषा दिनकर मापारी यांचे सह पाच उमेदवार निवडून आले, तर विरोधी गटाचे दोघे जण विजयी झाले होते.

या अटीतटीच्या अन् प्रस्थापितावि रुद्ध नवख्याच्या लढतीत एका मातब्बर व सुशिक्षीत तत्कालीन विद्यमान सरपंचाला केवळ एका मताअभावी पराभव पत्कारत गावाचे सिंहासन सोडावे लागले. मात्र सरपंच पदाचे आरक्षण होऊन 'ती' जागा इतर मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी आरक्षित झाल्याने रोजगारसेवक मापारी च्या पत्नीची सरपंच होण्याची नामीसंधी चुकून उपसरपंच पदाची माळ गळ्यात पडली.

परंतु म्हणतात ना 'दैव देते अन् कर्म नेते' त्याप्रमाणे विद्यमान सरपंच सिंधुबाई दादासाहेब शिंदे यांच्या पतीराजाने सरकारी जागेवर अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले हीच बाब हेरून ग्रामपंचायत सदस्य गोपीचंद दगडू आहेर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंच सिंधूबाईच्या पतीने सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्रतेसाठी प्रकरण दाखल केले.

त्यानुसार जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी पैठणच्या तहसिलदारांस प्रत्यक्ष चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. ता. १५ जून रोजी तहसीलदाराने आपला अहवाल सादर केला. अन् त्यांनी सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण व प्राप्त पुराव्यावरून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी तक्रारदार गोपिचंद आहेर यांचा अर्ज मंजूर करत

सरपंच सिंधुबाई शिंदे यांस अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व रद्द करून सदरील पद रिक्त केल्याचे आदेश मंगळवारी (ता.पाच डिसेंबर) पारीत केले. ही जागा रिक्त झाल्याने त्या रिक्त जागेवर उपसरपंच उषाताई मापारी यांची वर्णी लागली.

पैठणच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ता. २६ डिसेंबर रोजी उपसरपंचाकडे पदभार सोपविण्याचे आदेश दिले अन् ग्रामरोजगार सेवकाची पत्नी उषाबाई मापारी यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडून त्यांनी सरपंचांचा पदभार हाती घेतला तोच सिंधूबाई शिंदे ह्यांनी अप्पर विभागिय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांच्याकडे अपील दाखल केले.

त्यामुळे अप्पर विभागिय आयुक्तांनी सुनावणी होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला स्थगिती दिली होती. परंतु मंगळवारी (ता.२६ मार्च) अप्पर विभागिय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी सिंधूबाई शिदे यांचे अपील फेटाळून लावत जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे पुन्हा रोजगारसेवकाची पत्नी उषाताई मापारी यांस सरपंचपदाची नामी संधी मिळाली आहे.

आता ज्या ठिकाणी दिनकर मापारी ग्रामरोजगारसेवक म्हणून काम करित आहे, तेथे त्यांच्या पत्नीची सरपंचपदाची 'लॉटरी' लागली. गत विद्यमान सरपंचा विरुद्ध रोजगारसेवक, अन् त्यात विद्यमान सरपंचाचा अतिक्रमणामूळे पायउतार होऊन सत्तांतर होणे परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. रोजगारसेवक दिनकर मापारी हे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे खंदे समर्थक समजले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com