भाजलेल्या नातीचा मृत्यू, आजी-आजोबा गंभीर

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : घरातील दिवा अंगावर पडल्याने नातीचा भाजून मृत्यू झाला, तर आजी-आजोबाही गंभीर भाजले असून त्यांच्यावर नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही दुर्दैवी घटना चिकना (ता. धर्माबाद) येथे गुरूवारी (ता. पाच) रात्री दहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

चिकना (ता. धर्माबाद) येथे दत्ताहरी सिदराम साळुंके हे आपल्या वृध्द आई- वडिलांसह पत्नी व लहान मुलगी राहतात. दत्ताहरी साळुंके हे आपल्या शेतावर काम करण्यासाठी गुरूवारी (ता. पाच) रात्री गेले होते. त्यांची लाडकी सानवी (वय दहा महिणे) ही आपल्या आजी - आजोबासोबत झोपली होती. रात्रीच्या वेळी भारनियमन झाल्याने आजी गिन्याबाई (वय ४५) यांनी घरात रॉकेलचा दिवा लावला.

पेटता दिवा आपल्या बाजेच्या वर देवळीत ठेवला. बाजेवर झोपल्यानंतर पेटता दिवा अचानक त्यांच्या अंगावर पडला. सध्या कापूस वेचणीचे दिवस असल्याने दत्ताहारी यांनीही आपल्या शेतात कापसाची वेचणी करून घरात कापूस ठेवला होता. कापसाचे गाठोडे अगदी बाजेला लागुन असल्याने पेटले व सोबत कपड्यानेही पेट घेतला. यात ओरडण्याआधीच सानवी, गिन्याबाई आणि अशोक साळुंके हे गंभीर भाजले.

सानवी ही दहा महिण्याची बालिका जागीच होरपळून मरण पावली. तर गिन्याबाई आणि अशोक साळुंके यांना उपचारासाठी नांदेडला आणण्यात आले. या जळीत प्रकरणात गिन्याबाई 30 टक्के, तर अशोक साळुंके हे 80 टक्के भाजले असून, त्यांच्यावर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिस हवालदार श्‍यामसुंदर भवानगीरकर यांनी सांगितले.

कापूस, कपडे व अन्य संसारोपयोगी साहित्य जळून खाक

घटनेची माहिती मिळताच धर्माबादचे पोलिस निरीक्षक भागवत जायभाये, पोलिस हवालदार सुर्यकांत नागरगोजे आणि श्‍यामसुंदर भवानगीकर यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर घरातील कापूस, कपडे व अन्य संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. या दुर्दैवी घटनेनंतर चिकना गावात शोककळा पसरली होती. या प्रकरणी दत्ताहरी सिदराम साळुंके यांच्या माहितीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास श्री. भवानगीकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers Launch Water Protest In Kaygaon As Road Remains Encroached One Year After Written Assurance From Authorities
Unknown Young Man Found Dead In Godavari River Near Kaygaon Body Kept At Gangapur Hospital For Identification
Parbhani SIR
Shirur Kasar Loan Waiver
Marathi News Esakal
www.esakal.com