VIDEO : वारंवार 'तिचे' व्हाॅट्सअप स्टेटस पाहणेही विनयभंग, वाचा...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

व्हॉटसअॅपसारख्या समाजमाध्यमावर एखाद्या मुलीने तिचे स्टेटस बदलले की, लगेच पाहणे म्हणजे तिच्यावर चोरून नजर ठेवण्यासारखेच आहे. अथवा तिचा चोरून पाठलाग करण्यासारखे ठरते आणि याला आता कायद्याने गुन्हा ठरविले आहे.

औरंगाबाद - देशात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांनी सर्तक राहाणे गरजेचे झाले आहे. हल्ली सोशल मीडियावरूनही महिलांना त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत. पण, जर कुण्या मुलीने, महिलेने टाकलेले सोशल मीडियावर स्टेटस कुणी वारंवार पाहात असेल तर हा कायद्याने विनयभंगच ठरतो, अशी माहिती पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिली. 

दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देशांमध्ये महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कडक कायदे अस्तित्वात आले. मात्र, या कायद्याबाबत अजूनही देशभरात म्हणावी तशी जागृती झाली नाही. केंद्र सरकारने तयार केलेल्या 354 कलमानुसार आता महिलांची सुरक्षा ही अधिक सक्षमपणे काम करेल असे सांगितले जाते. सध्या कौटुंबिक हिंसाचार बलात्कार विनयभंग अशा अनेक घटना समाजामध्ये घडताहेत.

नुकतेच हैदराबादमधील घटनेने देशवासीयांचा हृदयाचा थरकाप उडाला. त्यानंतर पुन्हा महिलांची आणि मुलींचीची सुरक्षा कशी आहे, याची चर्चा सुरू झाली. सध्याच्या गुन्हेगारीमध्ये सोशल मीडियाचा वापरही गुन्हेगार करीत असल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे आता सोशल मीडियामार्फत केलेला गुन्हा किंवा करीत असलेली कृती ही त्या गुन्हेगाराला जेलपर्यंत नेऊन जाऊ शकते.

काय होईल - बाइकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले तर...? जाणून घ्या!
 

आता मुली अथवा महिलांकडे एकटक पाहणे, पाठलाग करणे गुन्हा ठरतो. विशेष म्हणजे हे सर्व करताना त्या व्यक्ती महिलेशी कोणतीही आगळीक केलेली नसली तरी तो सहज कारागृहामध्ये जाऊ शकतो. एवढेच नव्हे, तर व्हॉटसअॅपसारख्या समाजमाध्यमावर एखाद्या मुलीने तिचे स्टेटस बदलले की, लगेच पाहणे म्हणजे तिच्यावर चोरून नजर ठेवण्यासारखेच आहे. अथवा तिचा चोरून पाठलाग करण्यासारखे ठरते आणि याला आता कायद्याने गुन्हा ठरविले आहे.

जाणून घ्या - लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा.. 
 
ही आहे तरतूद
सोशल मीडियावरील व्हाॅट्सअप, फेसबूक ट्विटर, इंस्टाग्राम या माध्यमावरील एखाद्या मुलीचे किंवा महिलेचे स्टेटस, फोटो आणि डीपी वारंवार पाहत असाल तर तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. कारण या कायद्यानुसार असा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅपवरील एखाद्याचे स्टेटस वारंवार पाहणे हे पाळत ठेवण्यासारखे असून, तो एक प्रकारचा गुन्हा आहे. स्टेटस वारंवार पाहणाऱ्यांवर विनयभंगाच्या 354 (ड) कलमांनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो, असे औरंगाबाद शहर पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी सांगितले. 
 
तीन वर्षांची शिक्षा
भादंवी कलम 354 (ड) या कलमानुसार कोणत्याही स्त्रिचा चोरून पाठलाग करणे गुन्हा ठरतो. महिलेला स्पर्श न करता केवळ तिला भीती वाटल्याने हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर चोरून नजर ठेवल्याच्या आरोपाखाली या कलमाअंतर्गत पहिल्या गुन्ह्यासाठी तीन वर्षे कारावास आणि दंडाची तरदूत आहे. दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास पाच वर्षे शिक्षा आणि दंड होऊ शकतो.

एका तरुणीचा औरंगाबाद शहरातील एक तरुण फक्त पाठलाग करत होता. तरुणाने कुठलाही थेट त्रास दिला नाही. पण, संबंधित तरुणीच्या हालचालींवर लक्ष त्याच्याकडून ठेवले जात होते. तिच्यासोबत कोण आहे, कौटुंबिक परिस्थिती याची माहिती तरुणीच्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवरून तो तरुण जाणून घेत होता. याचा अर्थ तो तरुण तिच्यावर पाळत ठेवून होता. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहणे हा कलम 354 (ड) कलमान्वये गुन्हा ठरतो असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरुणींनीही फसवणूक होणार नाही, याची काळजी घेत कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केलेय.
- सुस्मिता दौड, वकील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Information About How to Report Abuse in WhatsApp