औरंगाबाद-पैठण मार्गावर  ‘ग्रीनफिल्ड’चा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - भारतमाला प्रकल्पात समाविष्ट झालेल्या विद्यमान औरंगाबाद-पैठण रस्त्यावर ‘ग्रीनफिल्ड’चा पर्याय योजण्यात आला आहे. यामुळे शेंद्रा आणि बिडकीन या दोन नव्या औद्योगिक  शहरांच्या रहदारीला वेग प्राप्त होणार असून, बिडकीन नोडच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. 

औरंगाबाद - भारतमाला प्रकल्पात समाविष्ट झालेल्या विद्यमान औरंगाबाद-पैठण रस्त्यावर ‘ग्रीनफिल्ड’चा पर्याय योजण्यात आला आहे. यामुळे शेंद्रा आणि बिडकीन या दोन नव्या औद्योगिक  शहरांच्या रहदारीला वेग प्राप्त होणार असून, बिडकीन नोडच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. 

औरंगाबाद-पैठण रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी पाहता बिडकीन ते पैठणदरम्यानचा प्रवास सुखाचा होण्यासाठी ‘ग्रीनफिल्ड’ रस्ता तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत शनिवारी (ता. चार) ही घोषणा केली. याअंतर्गत पैठण ते बिडकीनच्या विद्यमान रस्त्यालगत २९ किलोमीटरचा नवा रस्ता उभारण्यात येणार आहे. यासाठी नव्याने जमीन अधिग्रहण करण्यात येणार असून शेंद्रा-बिडकीन या औद्योगिक शहरांची जोडणी स्वतंत्र रस्त्याने करण्यात येईल. या रस्त्यावरील वाहतूक स्वतंत्रपणे बाहेर काढण्यात येणार असून, ती पैठणमार्गे बंदरांच्या दिशेने रवाना होण्यासाठी फायदा होणार आहे. दरम्यान, आठ हजार हेक्‍टरच्या बिडकीन नोडचा पाण्यासाठीचा संघर्ष ‘तीन पायांची शर्यत’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने प्रसिद्ध केला होता.

तिढा सोडविणार
‘ग्रीनफिल्ड’ रस्त्याचा पर्याय निवडणाऱ्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे विद्यमान रस्त्याच्या विस्ताराचा विचार अगोदर केला गेला. पण भूसंपादन, एमआयडीसी आणि औरंगाबाद महापालिकेच्या तीन जलवाहिन्या आणि त्यांतील समांतरचे त्रांगडे पाहता, हा तिढा नजीकच्या काळात सुटण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे स्वतंत्र वाट तयार करावी या उद्देशाने ग्रीनफिल्डचा पर्याय प्राधिकरणातर्फे निवडला गेला. औरंगाबाद ते बिडकीन गावापर्यंतच्या रस्त्याच्या विस्तारासाठी मात्र प्राधिकरणाकडे कोणतीही उपाययोजना अद्याप नाही.

Web Title: Greenfield option on the Aurangabad-Paithan route