सफाईवाल्या हातांना पेढे वाटुन सलाम

File Photo
File Photo

नांदेड : कोरोनाच्या पार्शवभूमिवर सध्या कौतुक होतय ते इतरांच्या आरोग्यांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रसासन यांच्या कामाचे. परंतु यांच्यासोबतच लॉकडाऊनमध्ये अख्खे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या हजारो सफाई कामरागांचे हात सदैव तत्पर आहेत. मात्र त्यांच्या कामाची फारशी कुठे दखल घेतली जात नाही हे वास्तव आहे. 

भाजपचे जिल्हा सरचिटणीस यांच्या कल्पनेतुन साकारलेल्या‘लायन्स क्लब’या उपक्रमातुन शहरातील पोलीस, आरोग्य कर्मारी आणि सफाई कामगारांना अवश्यकतेनुसार आहे त्या ठिकाणी जेवण पुरविण्याचे काम केले जात आहे. खरे तर त्यांच्याही कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. परंतु आपले आपणच कौतुक करावे या उक्तीप्रमाणे दिलीप ठाकुर यांनी सोमवारी (ता.६ एप्रिल २०२०) रोजी शहरातील सफाई कामगारांना मिठाई वाटुन तसेच शाल देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

हेही वाचा- Video : ‘कोरोना’शी लढा : नांदेडच्या आदित्यची ‘फेस शिल्ड’ किट ठरतेय वरदान
शहराची स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी कधीच कुणाकडून सत्कारा, गौरवाची अपेक्षा करत नाहीत. मात्र, दिलीप ठाकुर यांनी घडवून आणलेल्या सफाई कामगारांच्या हातांचा सत्कार केल्याने सफाई कामगार अक्षरशः भारावून गेले होते. सत्कारानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

शहराची सफाई करणाऱ्या कामगारांचा यापूर्वी कधीच सत्कार झाला नाही. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला नाही. मात्र देशात ता. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असताना नित्य नियमाने शहराच्या विविध भागात साठलेला कचरा उचलुन शहराला स्वच्छ ठेणाऱ्या सफाई कामगारांचे सत्कार सोहळे होत आहेत. लोक त्यांच्या गळात पैशांच्या माळा घालत आहेत. तर कुठे त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. 

हेही वाचले पाहिजे- माहूरला बुद्ध लेणी म्हणूनच झाली होती सुरुवात : अतुल भोसेकर
नांदेड शहरात देखील सफाई कर्मचारी यांची सहा सहा महिण्यापर्यंत पगार नसताना देखील कुठेही तक्रार न करता सफाई कर्मचारी नियमितपणे शहराची स्वच्छता व निटनेटकेपणा ठेवण्यात कुठेही कमी पडत नाहीत. त्यांच्या या कार्याला अनेकांनी सलाम केला आहे. तर दिलीप ठाकुर यांनी भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या निमित्ताने शहरातील शिवशक्तिनगर भागातील नियमितपणे स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मिठाईचा डबा, शाल, श्रीफळ देत त्यांच्या कार्याचा अगळा वेगळा गौरव केला आहे. या प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिपक सिंह रावत, गोपाल सिंह ठाकुर, राजेश सिंह ठाकुर, रोहित ठाकुर यांची उपस्थिती होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com