Ambad Crime : नवरदेव राम धाईत याने संपविले जीवन; जीवना बरोबर लग्नाचा बस्त्याचा उडाला रंग

डोमेगाव येथील तरुण युवक राम पांडुरंग घाईत (वय-27) वर्षे याने जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.
Ram Dhait
Ram Dhaitsakal
Updated on

अंबड, जि. जालना - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील तरुण युवक राम पांडुरंग घाईत (वय-27) वर्षे याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील राम धाईत या शेतकरी कुटुंबातील तरूण युवकाने बी.ए.पर्यंत शिक्षण घेतलेले होते. त्याचे नुकतेच लग्न जमले होते. जालना जिल्हयातील मंठा तालुक्यातील तळणी येथील एका मुलीशी विवाहाची मंगळवारी (ता.15) गाठ बांधली जाणार होती.

यामुळे लग्नाची जय्यत तयारी म्हणुन गुरूवारी (ता.3) जालना शहरात लग्नाचा नवरदेव, नवरीचा बस्ता बांधला होता. अवघ्या अकरा दिवसावर लग्नाची बांधली जाणारी रेशमगाठ अखेर मध्येच तुटली गेली.जालना शहरातुन बस्ता बांधल्यानंतर राम व त्यांचे नातेवाईक सायंकाळी आपल्या मुळ डोमेगाव येथे पोहचले. राम हा घरात कोणाला काहीही न बोलता शेतात निघून गेला.

घरातील राम च्या भावजाईने आपल्या पतीला राम घरातून जाताना नाराज होते. कोणाला काही बोललेच नाही. भावाने अनेकदा मोबाईलवर संपर्क केला. मात्र फोन उचलला गेला नाही. त्यानंतर कुटूंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. पाचोड येथे जावून पाहिले.मात्र तेथे शोध लागला नाही.

अखेर स्वतःच्या शेतात गेल्यानंतर गाव शिवारातील गट नंबर 173 मधील शेतातील निंबाच्या झाडाला रामने दोरीने गळफास घेऊन गुरूवारी रात्री सात ते साडे सात वाजेच्या दरम्यान आपली जीवनयात्रा संपविल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थ व नातेवाईकांच्या वतीने अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तपासणी करुण डॉक्टरनी मयत घोषीत केले. त्यानंतर श्र्व श्र्वाविचेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकूल वातावरणात राम धाईत यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पोलिसांना विचारले असता पोलिसांनी शोध सूरू आहे.

यातील कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नसल्याचे सांगीतले. अखेर राम आपल्या जीवनाचा रंग उडवीत लग्नाचा बांधलेला बस्त्याचा रंग हि उडाला आहे. या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, भावजाई, दोन पुतणे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com