The group development officers working in Sengaon Panchayat Samiti are always absent from the office
The group development officers working in Sengaon Panchayat Samiti are always absent from the office

सेनगावात गटविकास अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याने पंचायत समिती सदस्यांचा बैठकीवर बहिष्कार

Published on

सेनगाव (हिंगोली) : येथील पंचायत समितीमध्ये प.स. सदस्य व सभापती यांची बैठक घेतली जाते. मात्र संबंधित गटविकास अधिकारी सदरील बैठकीस सतत दांडी मारत असल्यामुळे पंचायत समिती सदस्यांनी बुधवार या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.

सेनगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले गटविकास अधिकारी नेहमीच कार्यालयाला दांडी मारीत असल्याने पं.स. सदस्यांच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे सर्व सदस्यांनी या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. विविध कामांविषयी आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या वतीने मासिक बैठकीचे आयोजन करण्यात येते. परंतु या बैठकीला दर वेळस स्वतः गटविकास अधिकारीच गैरहजर राहत असल्यामुळे पं.स. सदस्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीमध्ये गटविकास अधिकारीच गैरहजर असल्यामुळे पंचायत समितीच्या सदस्य व सभापती यांनी तिव्र संताप व्यक्त करत आजच्या होणाऱ्या बैठकीवर बहिष्कार टाकत ही बैठक रद्द करण्यात आली. यावेळी सभापतीसह सर्व सदस्यांची उपस्थिती होती. आता वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराबाबत काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com