मानाच्या गुढीने दिला पाणीबचतीचा संदेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

लातूर - येथील मानाच्या सार्वजनिक गुढी महोत्सव समितीच्या वतीने मंगळवारी (ता. 28) गुढीपाडव्यानिमित्त गंजगोलाईतील जगदंबा देवी मंदिराच्या समोर गुढी उभारून पाणी वाचविण्याचा संदेश देण्यात आला. या निमित्ताने समितीच्या वतीने गुढीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या माध्यमातून पाणी वाचवा जीवन वाचवा असा संदेश देण्यात आला. जिल्ह्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून पूजा करण्यात आली. 

मंगळवारी (ता. 28) गुढीपाडवा असल्याने सकाळपासून येथील गंजगोलाई, सुभाष चौक, दयानंद महाविद्यालयाच्या परिसरात फुलांचे हार तसेच खोबऱ्याचे हार खरेदीसाठी गर्दी झाली होती. घरोघरी सकाळीच गुढी उभारून त्याची मनोभावे पूजा करण्यात आली. शहरात गंजगोलाई परिसरात मानाची गुढी उभारली जाते. या निमित्ताने समितीच्या वतीने सकाळी गंजगोलाई परिसरातून गुढीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पाणीबचतीचा संदेश देण्यात आला. यावेळी अध्यक्ष महादेव पवार, कार्याध्यक्ष ऍड. प्रदीपसिंह गंगणे यांच्या हस्ते गुढीची पूजा करण्यात आली. दलित मित्र पुरस्कार प्राप्त डॉ. संजय जमदाडे यांचा समितीच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी विजय दबडगावकर, शिरीष पोफळे, बसवंत भरडे, रामेश्वर भराडिया, वीरभद्रे वाले, दत्ता चेवले, समद शेख, शिरीष तुळजापुरे, ज्ञानेश्वर जाधव, किरण सावंत, रामभाऊ जवळगेकर अरविंद वाडकर, सुदर्शन पांढरे, राजकुमार बिराजदार उपस्थित होते. गुढीपाडवा हा साडे तीन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे शहरात काही ठिकाणी नवीन गृहप्रकल्पांना सुरवात झाली. शहरातील दुचाकी व चारचाकी शोरूममध्ये वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी राहिली. तसेच गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत अनेकांनी सोन्याची खरेदी केली. 

हरभऱ्याची मोठी आवक 
लातूर उच्चत्तम कृषिउत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात गुढीपाडव्यानिमित्त शेतीमालाची मोठी आवक राहिली. यात हरभऱ्याची आवक 22 हजार क्विंटल होती. कमाल भाव सहा हजार 39 रुपये प्रति क्विंटल राहिला. सोयाबीनची आवक 14 हजार 233 क्विंटल होती तर कमाल भाव दोन हजार 821 रुपये प्रति क्विंटल राहिला. तुरीची आवक आठ हजार 155 क्विंटल राहिली तर कमाल भाव चार हजार 722 रुपये राहिला. 

Web Title: gudhipadwa celebration in latur