देशातील सर्वच स्तर असुरक्षित : आझाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

आज देशातील माध्यमे असुरक्षित आहेत, त्यानंतर दलित, युवा महिला आणि शेतकरी सुद्धा असुरक्षित आहेत. दलित, अल्पसंख्यांक आणि माध्यमेसुद्धा आज असुरक्षित आहेत. नुसती भाषणे करून देश चालत नाही,  सध्याचे सरकार हवेवर आणि टीव्हीच्या साहाय्याने चालते आहे, अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी केली.

औरंगाबाद : देशात आज सर्वच स्तरांमधील लोक असुरक्षित आहेत. बोलणाऱ्याचे घरांवर छापे टाकले जात असताना आज वेगळीच लोकशाही पाहायला मिळत आहे. माध्यमे आज सर्वात जास्त असुरक्षित आहेत अशी टीका काँग्रेसचे नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी केली.

काँग्रेसच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी शहरात आले असता त्यांनी रविवारी (ता. १३) पत्रकारांशी संवाद साधताना हे टीकास्त्र सोडले. 

आज देशातील माध्यमे असुरक्षित आहेत, त्यानंतर दलित, युवा महिला आणि शेतकरी सुद्धा असुरक्षित आहेत. दलित, अल्पसंख्यांक आणि माध्यमेसुद्धा आज असुरक्षित आहेत. नुसती भाषणे करून देश चालत नाही,  सध्याचे सरकार हवेवर आणि टीव्हीच्या साहाय्याने चालते आहे, अशी टीका गुलाम नबी आझाद यांनी केली.

गोरखपूर घटनेसाठी तेथील राज्य सरकार आणि कॉलेज प्रशासन जवाबदार असल्याचे ते म्हणाले. नव्याने आलेली जीएसटी कर प्रणाली उद्योग आणि व्यापारावर विपरीत परिणाम करणारी ठरत आहे. स्टील, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल सारखे उद्योग यामुळे बंद पडत असल्याचे आझाद म्हणाले.

Web Title: Gulam Nabi Azad criticize Narendra Modi government