गुरूद्वारा बोर्डातर्फे शहा यांचा विमानतळावरच सत्कार

nanded
nanded

नांदेड : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा नियोजित कार्यक्रम रद्द झाल्याने त्यांचा गुरूद्वारा बोर्डातर्फे विमानतळावरच सोमवारी (ता. 7) सत्कार केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शहा लातूर येथील पक्षाच्या कार्यक्रमासाठी नांदेड मार्गे लातूरला रविवारी गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांचा सोमवारी  नांदेड शहरात नियोजित गुरूद्वारा दर्शन आणि कार्यकर्ता बैठक होणार होती. परंतु, अचानक हे नियोजन रद्द झाले. त्यामुळे गुरुद्वारा सचखंड बोर्ड आणि भाजपच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शहा यांचा विमानतळावरच सत्कार केला.

यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे सरदार तारासिंग, सरदार डी. पी. सिंग, सरदार लड्डुसिंग महाजन यांनी गुरू गोविंद सिंग यांची प्रतिमा देऊन सत्कार केला. तसेच भाजप पदाधिका-यांतर्फे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष डाॅ. संतुक हंबर्डे, सरचिटणीस प्रवीण साले, राजेश पवार, आमदार तुषार राठोड,  चैतन्यबापू देशमुख यांनी सत्कार केला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com