तीन लाखाचा गुटखा जप्त, एफडीआयची कारवाई  

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नांदेड : जुना मोंढा भागातील महाविर मुलचंद दर्डा यांच्या मालकीच्या जय गुरूगणेश ट्रेडर्सवर छापा टाकून विविध कंपनीचा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखू असा दोन लाख 88 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध विभागाने गुरूवारी (ता. 24) दुपारी केली.

नांदेड : जुना मोंढा भागातील महाविर मुलचंद दर्डा यांच्या मालकीच्या जय गुरूगणेश ट्रेडर्सवर छापा टाकून विविध कंपनीचा प्रतिबंधीत गुटखा व सुगंधीत तंबाखू असा दोन लाख 88 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध विभागाने गुरूवारी (ता. 24) दुपारी केली.

राज्यात गुटखा व सुगंधीत सुपारी आणि तंबाखु वापरणे, विकणे आणि साठा करून ठेवणे हा गुन्हा आहे. तरी सुध्दा काही व्यापारी आपल्या फायद्यासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळ करीत आहेत. गुटखा बंदी असतांना शहरात सर्रास पानठेल्यावर व हॉटेल, दुकानांवर गुटखा विक्री केल्या जाते. गुटखा तस्करीचे मुख्य केंद्रस्थान देगलुर नाका असून या भागात विविध कंपन्यांचे गुटखा तस्कर तेलंगना आणि कर्नाटका राज्यातून आयात करतात. शहरात ते लहान मोठ्या व्यापाऱ्यांना चढा भावाने गुटखा विक्री करतात. अशा अनेक तक्रारी अन्न व औषध विभागाकडे प्राप्त झाल्याने अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांनी आपले सहकारी सुनील जिंतुरकर आणि अनुपमा महाजन यांना सोबत घेऊन जुना मोंढा येथील जयगणेश ट्रेडर्सवर छापा टाकला. यावेळी त्यांनी प्रतिबंधीत असलेला आरएडी, रजनीगंधा, पानमसाला, सुंगधीत तंबाखु असा दोन लाख 88 हजार 930 रुपयाचा अन्न पदार्थ जप्त केला. दुकान मालक महावीर दर्डा यांना ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रतिबंधीत गुटखा किंवा मानवी आरोग्यास घातक असलेला अन्न्पदार्थ जर कोणी विकत असेल किंवा साठा करून ठेवला असेल तर अन्न व औषध प्रशासनाला कळवावे. त्याचे नाव गोपनीय ठेवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आरोग्याला घातक असलेले पदार्थ, उघड्यावरील पदार्थ नागरिकांनी खाण्यास टाळावे असे आवाहन अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांनी केले आहे. 

Web Title: Gutkha of 3 lakhs seized in Nanded