नांदेडमध्ये साडेपाच लाखाचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

जुन्या नांदेडातील चौफाळा भागात स्थागुशाचे पोनि राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विश्वंभर पल्लेवाड व त्यांचे पोलीस कर्मचारी ४ जुलै रोजी पेट्रोलींग करीत होते. यावेळी रामेश्वर मारोतराव ठाकुर हा गुटखा घेवून जात असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.

नांदेड : शासनाने प्रतिबंधीत केलेल्या विविध कंपन्याच्या गुटख्याची शहर व जिल्ह्यात खुलेआम विक्री सुरु आहे. अनेक ठिकाणी गुटख्याचे साठे आढळून येत आहे. अशाच एका गुटख्याच्या साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (४ जुलै ) रोजी धाड टाकून ५ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा  रंजनीगंधा, गोवा आदी कंपन्याचा गुटखा जप्त केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

जुन्या नांदेडातील चौफाळा भागात स्थागुशाचे पोनि राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विश्वंभर पल्लेवाड व त्यांचे पोलीस कर्मचारी ४ जुलै रोजी पेट्रोलींग करीत होते. यावेळी रामेश्वर मारोतराव ठाकुर हा गुटखा घेवून जात असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले.

यावेळी पोलीसांनी चौकशी केली असता सदर गुटखा मो.इम्रान मो. अशरफ यांच्या घरातून दुकानात घेवून जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलीसांनी घर व दुकानाची झाडाझडती घेतली असता गोवा, रजनीगंधा या सारख्या गुटख्याचा साठा आढळून आला. यामध्ये पोलीसांनी ५ लाख ३८ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सपोनि विश्वंभर पल्लेवाड यांनी दिली आहे..पूर्ण प्रल्हाद कांबळे..

Web Title: Gutkha seized in Nanded

टॅग्स