ईपीएस 95 निवृत कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

परभणी : ईपीएस 1995 निवृत कर्मचारी समन्वय व लोककल्याण संस्था, अखिल भारतीय ईपीएस 1995 संघर्ष समितीने मासिक पेन्शन वाढीच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता.22) परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करुन लाक्षणीक उपोषण केले.

कर्मचारी पेन्शन योजना 1995 (ईपीएस) मधील निवृत कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन 7 हजार 500 रुपये व महागाई भत्ता लागु करावा, ता.31 मार्च 2017 रोजी ईपीएफओने काढलेले परिपत्रक रद्द करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे पूर्ण वेतनावर पेन्शन निवडीची संधी द्यावी, पेन्शन मिळत नसलेल्या कामगांराना 1995 चच्या योजनेत समाविष्ठ करुन घ्यावे,या तिन्ही मागण्या मान्य होईपर्यंत खासदार भगतसिंग कोशीयारीच्या अहवालानुसार 5 हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता द्यावा अशा मागण्यांसाठी ईपीएस 1995 संघर्ष समितीने शुक्रवारी दुपारी एक वाजता मुंडन आंदोलन केले.

Web Title: haircut agitation of 95 eps pensioners