समर्थ कारखान्यात बनविणार हँड सॅनिटायझर 

तीर्थपुरी : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्यास हँड सॅनिटायझर निर्मितीसाठी परवाना देताना अन्न व औषधी सहायक आयुक्त श्री काळे. 
तीर्थपुरी : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्यास हँड सॅनिटायझर निर्मितीसाठी परवाना देताना अन्न व औषधी सहायक आयुक्त श्री काळे. 

तीर्थपुरी (जि.जालना) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाच्या प्रादुर्भावास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हात धुण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे. परंतु देशभरातील वाढती मागणीमुळे तुटवडा जाणवू नये म्हणून जालना जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याने हँड सॅनिटायझरचे उत्पादन घेण्याबाबत पावले उचलली आहेत. याबाबतचा परवाना अन्न आणि औषध विभागाकडुन बुधवारी (ता.२५) मिळाला असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक दिलीप पाटील यांनी सांगितले. 

कोरोनाने देश सर्वत्र थैमान घातले असल्याने प्रशासन दक्ष झाले आहे या विषाणूपासून बचाव करण्यासाठी हात धुण्यासाठी नागरिक हँड सॅनिटायझरचा वापर मोठ्या करतात. हँड सॅनिटायझरने हात धुतल्याने जिवाणू नष्ट होतात. त्यामुळे नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात या हँड सॅनिटायझर मागणी होत आहे.

मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर कारखान्यात या हँड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू करण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याला हँड सॅनिटायझर बनवण्याचा परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी लवकरच हँड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू होईल. जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरील नागरिकांना हँड सॅनिटायझर उपलब्ध होईल.

हँड सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण होण्याची आहे. बाजारात १०० मिलीलीटरची पॅकिंग मिळत असले तरी किंमत मात्र जास्त आहे. केंद्र सरकारने साखर कारखान्याला २०० मिलीलीटर हँड सॅनिटायझरची किंमत जास्तीत जास्त १०० रुपये ठेवण्यात यावे या अटीवर परवाना देण्यात आला असल्याचे समजते. 

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना हा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असून सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी हँड सॅनिटायझर ची निर्मिती करण्यात येणार आहे. या कारखान्याला नुकतीच परवानगी मिळाली असून लवकरात लवकर कारखाना हँड सॅनिटायझरची निर्मिती करणार आहे. 
-उत्तमराव पवार 
उपाध्यक्ष, साखर कारखाना अंकुशनगर

कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यात हँड सॅनिटायझरची निर्मितीसाठी परवाना मिळाला असून या ठिकाणी इतर लागणारे साहित्य मिळताच हँड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू करण्यात येईल. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांची मोठी अडचण दूर होईल. 
-दिलीप पाटील 
कार्यकारी संचालक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com