आज नांदेडमध्ये ‘ हे ’ घडले

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

नांदेड : महावितरणचा विज पुरवठा खंडीत करून डीपीमधील तांब्याची तार व आॅईल चोरणारी टोळी जेरबंद. ही कारवाई विष्णुपूरी परिसरात मंगळवारी (ता. १२) नोव्हेंबरच्या दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

नांदेड : महावितरणचा विज पुरवठा खंडीत करून डीपीमधील तांब्याची तार व आॅईल चोरणारी टोळी जेरबंद. ही कारवाई विष्णुपूरी परिसरात मंगळवारी (ता. १२) नोव्हेंबरच्या दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. 

शहर व जिल्ह्यात पाहिजे व फरार आरोपींना अटक करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शऩाखाली स्थागुशाचे एक पथक शहर व विष्णुपूरी परिसरात गस्त घालत होते. पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी पांगरा शिवारात असलेल्या पोलिस फायर बट (पोलिस गोळीबार कवायत मैदान) जाणाऱ्या पाईप लाईनच्या वॉलजवळ सापळा लावला. यावेळी तेथे एका पोत्यात चोरी करुन आणलेला ५२ किलो तांब्याचा तार भरत असतांना चोरटे दिसले. 

पोलिसांनी घेराव घालुन किसन गोविंद पुलेवार (वय ४०) रा. पांगरी (ता. नांदेड), माधव किशन काळे (वय ४७) रा. लोंढे सांगवी (ता. लोहा) आणि रामदास माधवराव घोगरे (वय २८) रा. असदवन (ता. नांदेड) या तिघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून महावितरणच्या डीपीमधील तांब्यांचा ५२ किलोग्राम तार, काही लिटर आॅईल व एक दुचाकी असा ३३ हजार ५८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी या तिन्ही चोरट्यांना लिंबगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याविरुध्द लिंबगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार गणेश गोटके करित आहेत. 

हे ही वाचा 

शाळकरी विद्यार्थ्याला लुटले

नांदेड : रस्त्यात मित्रांसह थांबलेल्या एका शाळकरी विद्यार्थ्याला अनोळखी तिघांनी दुचाकीवरून येऊन चाकु धाकवून मोबाईल जबरीने पळविला. ही घटना रविवारी (ता. १०) नोव्हेंबरच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास एका मंगल कार्यालय रस्त्यावर घडला. 

नांदेड शहर हे शिक्षणाचे हब बनले असून या ठिकाणी वैद्यकिय व अभियांत्रीकी पूर्व परिक्षेसाठी राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थीनी येतात. या विद्यार्थ्याना येथील काही स्थानिक गुन्हेगारीकडे वळलेले तरूण धमकावत असतात. त्यांच्याकडून मोबाईल व पैशाची मागणी करून वेळप्रसंगी मारहाण करीत अाहेत. असे अनेक प्रकरणे भाग्यनगर, आनंदनगर, श्रीनगर, कैलासनगर आणि बाबानगर या खासगी शिकवणी परिसरात घडल्याच्या घटना आहेत. 

अशाच प्रकार आशिषनगर येथील एक सतरा वर्षीय विद्यार्थी भोजनालयावर जेवन करून खोलीवर जाण्यासाठी आपल्या अन्य मित्रासोबत एका मंगल कार्यालयासमोर थांबला होता. यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर (एमएच२६बीएम-५९६१) वर अनोळखी तीन चोरटे तेथे आले. त्यापैकी एकाने चाकुचा धाक दाखवून उभ्या असलेल्या एका विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून घेतला. आणि लगेच तेथून पसार झाले.

हा प्रकार त्याच्या मितांनीही पाहिला परंतु विद्यार्थ्यी ककाहीच करु शकले नाही. शेवटी त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांन सांगितला. एका विद्यार्थ्याच्या फिर्यादीवरुन अनोळखी तिघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. नरवाडे करित आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This happened in Nanded today