फुलंब्री शहराची वाटचाल विकासाच्या दिशेने : हरिभाऊ बागडे

Phulambri
Phulambri

फुलंब्री : फुलंब्री नगरपंचायतला आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात येत असून त्यामुळे सध्या फुलंब्री शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्रीचे हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री नगरपंचायतच्या वतीने विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सोमवारी केले आहे.  

फुलंब्री नगरपंचायतच्या 1 कोटी 75 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण, दिव्यांग बांधवांच्या 5 टक्के निधीचे वितरण आदी कार्यक्रमाचे भूमिपूजन, बक्षीस वितरण बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बागडे बोलत होते. माजी मंत्री नामदेव गाडेकर, यावेळी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जैस्वाल, शिवाजी पाथ्रीकर, उपसभापती एकनाथ धटिंग, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष नामुआणा नवपुते, कल्याण चव्हाण, मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलतांना बागडे म्हणाले, फुलंब्री नगरपंचायत 10 जून 2015 ला अस्तित्वात आली. मात्र फुलंब्री-पानवाडी महसूल हद्दीच्या वादाने तब्बल तीन वर्षे प्रशासक फुलंब्री नगरपंचायतचे कामकाज पाहत होते. प्रशासक काळात ही सरकारने फुलंब्री नगरपंचायतला 14 कोटी रुपये दिले आहे. शासनाच्या वतीने फुलंब्री नगरपंचायतला भविष्यात विकास कामासाठी आवश्यक ती मदत निश्चित करण्यात येईल. शासनाने शेतकऱ्यांसाठी पीक विम्यामध्ये मोठा बदल घडवून आणला आहे 2012-13 ला अधिक दुष्काळ होता. तेव्हा तालुक्यातील 1749 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. त्यात 39 लाख 46 हजार रुपयांच्या लाभ शेतकऱ्यांना मिळाला होता. 2014-15 ला नवीन सरकार आले त्यावेळी 5173 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांना त्यापोटी 2 कोटी 88 लाख 10 हजार रुपयांचा लाभ मिळला आहे. भाजप सरकारचया मागील चार वर्षाच्या कार्यकाळात पिकविम्या पोटी शेतकऱ्यांना एकूण 11 हजार 952 कोटी रुपयांच्या विमा वाटप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी हमी भावाच्या दीडपट भावाचे धोरण शासनाने लागू केले. या धोरणाचे स्वामीनाथन आयोगाने स्वागत केले आहे. आघाडी सरकारने संपूर्ण देशात 71 हजार कोटीची त्यात महाराष्ट्राच्या वाटल्या साडेसहा हजार कोटी मिळाले होते. तर महाराष्ट्र सरकाने दिलेल्या कर्जमाफीत आतापर्यत 17 हजार कोटींची कर्जमाफी दिली असून योजना अद्याप ही सुरूच आहे. 2015 पासून 2 रुपये किलो दराने धान्य दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाना देण्यात आले. तसेच महात्मा फुले जीवनदायी योजने अकराशे आजार, गॅस योजना, आयुष्यमान भारत, बेघरांना घरे देण्याचे काम सरकार करत आहे.

याप्रसंगी भाजपा महिला तालुकाध्यक्ष कौशल्या जंगले, प.स.सदस्य सविता फुके, संजय त्रिभुवन, राजेंद्र डकले, विकास गायकवाड, योगेश मिसाळ, गजानन नागरे, वाल्मिक जाधव, बाबासाहेब शिनगारे, राम बनसोड, आवेज चिस्ती, जफर चिस्ती, रुउफ कुरेशी, मुद्दसर पटेल, गायबाई प्रधान, वैशाली शिनगारे, रत्ना सोनवणे, एकनाथ ढोके, अकबर पटेल, असिफ पटेल, गणेश राऊत, आशपाक पटेल, पंडित नागरे, सुमित प्रधान, जनार्धन शेजवळ, गुलाब पटेल, नगरपंचायत कर्मचारी संतोष रोकडे, विशाल पाटील, भाऊसाहेब राऊत, गजानन तावडे, भगवान होनमाळी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com