soyabean crop
sakal
अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्याला खरीप हंगामात बसला आहे. भर पावसाळ्यात पावसाने अंबड तालुक्यात पाठ फिरविली होती. मात्र परतीच्या पावसाने दाणादाण उडविली आहे. तोंडी आलेला घास अखेर नैसर्गीक आपत्तीने हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अर्थिक अडचणीत सापडला आहे.