esakal | परीक्षेत पास करतो म्हणून तिला बसविले वर्गात एकटिलाच...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

 विद्यार्थींनीने कुटुंबातील सदस्यांनासोबत घेऊन बोरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून बोरी पोलिस ठाण्यात शिक्षक जगजिवन गवई यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परीक्षेत पास करतो म्हणून तिला बसविले वर्गात एकटिलाच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बोरी : दुधगाव (ता.जिंतुर, जि.परभणी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (ता.१५) घडली. दरम्यान, शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दुधगाव (ता.जिंतूर,जि.परभणी ) येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी दहावीच्या पुरवणी परीक्षाच्या विज्ञान विषयाचे प्रात्यक्षिक होते. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी गावातील एक विद्यार्थीनी सकाळी दहा वाजता शाळेत दाखल झाली. शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक जगजिवन गवई यांनी विद्यार्थ्यांना एका वर्गात तर विद्यार्थींनीला वरील मजल्यावरील वर्गात एकटीला बसवले. शिक्षक जगजिवन गवई यांनी परीक्षेत पास करतो म्हणत विद्यार्थीनी सोबत लगट करण्यास सुरुवात केली. परीक्षा झाल्यानंतर सदरील विद्यार्थीनीने घडलेला प्रकार घरी सांगितला. विद्यार्थींनीने कुटुंबातील सदस्यांनासोबत घेऊन बोरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून बोरी पोलिस ठाण्यात शिक्षक जगजिवन गवई यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली संजय काळे व सुनिल गिरी हे करीत आहेत.

हेही वाचा ....

ट्रक अपघातातील आरोपीस दंडात्मक शिक्षा
परभणी : ट्रक सायकलच्या अपघातात एका १३ वर्षीय बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता.१४) ११ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना ३ दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
अशोक ज्योेतीबा काळे हे ता. ३ मे २०११ च्या रात्री दिंडीत देवाचे दर्शन घेऊन परत आले. रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर अशोक काळे यांच्या पत्नी आणि एक मुलगा घराकडे निघाले. तर दुसरा मुलगा बालाजी काळे हा अशोक काळे यांच्यासोबत सायकलवर जात होता. वसमत रोडवर जवादे रुग्णालयाजवळ रात्री आठच्या सुमारास (एम. एच. १९ झेड. ०२६१) या वाहनाने अशोक काळे यांच्या सायकलला धडक दिली. यामध्ये बालाजी काळे याचा मृत्यू झाला. अशोक काळे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक अन्वर खान रशीद खान पठाण याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता.

हेही वाचा - रेल्वे लाईन दुहेरी करणाचे काम पूर्णत्वास


दोषारोप पत्र दाखल
 नवा मोंढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक यु. आर. चव्हाण यांनी तपास करत दोषारोप पत्र दाखल केले होते. शुक्रवारी न्यायाधीश वैशाली पंडित यांनी आरोपीस ११ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना तीन दिवसाची शिक्षा, फिर्यादीला नुकसान भरपाई, कोर्ट उठेपर्यंत एका दिवसाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ज्ञानेश्वर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. पी. कुलकर्णी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरिक्षक तट यांच्या मार्गदर्शनाखाली पोह. अफजलखान पठाण, प्रकाश पंडित यांनी काम पाहिले.
 

loading image
go to top