लिंगबदलानंतर ललिता पुरुष म्हणून पोलिस दलात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

बीड : बीड जिल्हा पोलिस दलातील महिला पोलिस शिपाई ललिता साळवे यांच्यावर झालेल्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर आता त्यांना पोलिस दलात पुरुष प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (ता. चार) पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांना याबाबत महासंचालक कार्यालयातून पत्र मिळाले. या बहुचर्चित प्रकरणाचा आता नवा टप्पा सुरू झाला आहे. 

माजलगाव शहर ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत ललिता साळवे यांना सुरवातीला आपल्या शरीरात बदल होत असल्याचे जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला व सप्टेंबर 2017 मध्ये पोलिस अधीक्षकांकडे परवानगीसाठी अर्ज केला. अशाप्रकाराचा पोलिस दलातील हा पहिलाच प्रसंग असल्याने हे प्रकरण वरिष्ठांकडे वर्ग करण्यात आले. यावर बराच खल होऊन अखेर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून नऊ महिन्यांनंतर ललिता यांच्यावर गेल्या महिन्यात लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली होती. 

Web Title: he change his sex and join police force

टॅग्स