मुख्याध्यापकाची शिक्षकाला धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

पगार लवकर काढण्याची मागणी करणाऱ्या शिक्षकाला मुख्याध्यापकाने धक्काबुक्की करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी भोसी (ता. जिंतूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला. याबाबत शाळेतील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली.

जिंतूर (जि. परभणी) - पगार लवकर काढण्याची मागणी करणाऱ्या शिक्षकाला मुख्याध्यापकाने धक्काबुक्की करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी भोसी (ता. जिंतूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला. याबाबत शाळेतील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली.

भोसी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून, मुख्याध्यापकांसह नऊ शिक्षक सेवारत आहेत. शनिवारी मुख्याध्यापक एम. आर. सोन्नेकर यांच्याकडे शाळेतील सहशिक्षक गुणाजी सखाराम गव्हाणे यांनी "जुलै महिन्याचा पंधरवडा संपला असतानाही अद्याप आमचा जून महिन्याचा पगार झाला नाही. तुमच्या खात्यात बुधवारी पगार जमा झाला आहे,' असे म्हणत पगाराबाबत विचारपूस केली. मुख्याध्यापक सोन्नेकर यांची शिक्षकांसोबत शाब्दिक चकमक झाली. त्यात त्यांनी शिक्षक गव्हाणे यांच्या शर्टची कॉलर पकडून उद्धट भाषेत त्यांच्याशी शाळेतील कार्यालयात गैरवर्तन केले. या प्रकरणाची व्हिडिओ क्‍लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Headmaster Beating to Teacher Crime