दीड लाखांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले

headmaster, who took the bribe of one and a half lakhs, was caught red-handed
headmaster, who took the bribe of one and a half lakhs, was caught red-handed

परळी : दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वैद्यनाथ विद्यालयाच्या मुख्याध्यापकला शनिवारी (ता. 1) रंगेहाथ पकडले. नंदकिशोर पापलाल मोदी असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. सेवेतून कार्यमुक्त केलेल्या लिपिकाच्या तक्रारीवर शिक्षणाधिकारी यांच्यासमोर बाजू मांडण्यासाठी 2 लाखांची लाच मागून त्यापैकी दिड लाखांची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तीन दिवसांत जिल्ह्यात केलेली ही चौथी कारवाई आहे.

2012 साली वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील चार शिक्षक आणि एक लिपिक यांची नेमणूक नियमबाह्य असल्याचे कारण देत संस्थेने त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले. यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली होती. याची चौकशी बीड चे शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुरु आहे. या चौकशीत लिपिक पदाच्या संबंधी बाजू मांडण्यासाठी वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर पापालाल मोदी याने विद्यमान लिपिकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती. रक्कम न दिल्यास तुमची सेवा समाप्त करून पूर्वीच्या लिपिकास सेवेत पुन्हा रुजू करण्यात येईल असेही मोदी याने विद्यमान लिपिकास बजावले होते.

लाच लुचपत विभागाने तक्रारीची खातरजमा करून पाळत ठेवली असता मोदीने दिड लाख रुपये स्वीकारण्याचे आणि उर्वरित 50 हजार एक महिन्यानंतर स्वीकारण्याचे मान्य केल्याचे आढळून आले. त्यानुसार शनिवारी पथकाने मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी याच्या पेठ गल्ली देशमुख पार येथील राहत्या घरून दिड लाखांची रक्कम स्वीकारताच मुख्याध्यापक मोदी याला पकडले. याला एसीबीच्या पथकाने झडप घालून रंगेहाथ पकडले. कारवाईत उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक वाघ, पोलीस कर्मचारी कल्याण राठोड, दादासाहेब केदार, मनोज गदळे, सखाराम घोलप, भरत गारदे, अशोक ठोकळ, विकास मुंडे, अमोल बागलाने यांनी सहभाग घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com