‘कोरोना’च्या धोक्याची माहिती देणारे ‘आरोग्य सेतु’ ॲप

File Photo
File Photo

नांदेड : यापूर्वी अनेक प्रकारचे ॲप तुम्ही बघितले असतील, त्याचा वापरही केला असेल आता भारत सरकारने चक्क ‘कोरोना’व्हायरसच्या संकटावर विजय मिळविण्यासाठी व नागरिकांना ‘कोरोना’पासून सतर्कता बाळगण्यासाठी व धोक्याची माहिती अवगत करणारा ‘आरोग्य सेतु’ नावाचा ॲप लॉन्च केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हे ॲप प्रत्येक नांदेडकराने डाऊनलोड करावे, असे आवाहन देखील केले आहे.

भारत सरकारने आठवडाभरापूर्वी लॉन्च केलेल्या या ‘ॲप’ला आत्तापर्यंत एक कोटी ८० लाख लोकांनी जाणून घेऊन त्याचा वापर सुरु केल्याची माहिती ‘गुगल’च्या सर्च इंजिनवरुन लक्षात येते. अनेक भाषांमध्ये उपलब्ध असलेले हा ॲप कुणीही सहज ॲन्ड्रॉईड मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन ‘आरोग्य सेतु’ वॉलंटियर म्हणून देखील संकटकालीन शासनास मदतगार ठरु शकतो. यासाठी हे ॲप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणे गरजेचे आहे.

असे करा ॲप डाऊनलोड 
गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ‘आरोग्य सेतु’ टाईप करुन ॲप डाऊनलोड करताच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारणा होते. त्यानंतर दिलेल्या मोबाईल नंबरवर ‘ओटीपी’ नंबर मिळतो. पुढे ‘कोरोना’ आजारा संदर्भात काही प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास तुमची मागील १४ दिवसातील ट्रायव्हल हिस्ट्री विचारली जाते, विदेशी नागरिकांच्या संपर्कात किंवा विदेश दौरा केला का? प्रश्न विचारला जातो. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्ही ‘कोरोना’`आजारापासून किती सुरक्षित आहात किंवा नाहीत या बद्दल तुमच्या मोबाईलच्या स्क्रिनवर माहिती येते. 

अंतर कसे ठेवायचे, याची माहिती
इतकेच नव्हे तर, पुढच्या टप्यात सामाजिक अंतर कसे राखायचे, स्व-आकलन चाचणी कशी करुन घ्यावी, अंतर कसे टिकवून ठेवायचे, एकमेकात किमान सहा फुटाचे अंतर कसे पाळायचे ‘कोरोना’ व्हायरसचा धोका टाळण्यासाठी काय केले पाहिजे अन काय नाही, अशी महत्वपूर्ण माहिती या ॲपच्या माध्यमातुन मिळते. त्यामुळे ‘कोरोना’ची चाचणी तुम्ही स्वतःकरु शकता व तुमच्या आजुबाजुस असलेले कोरोनाचे संकट टाळु शकता. याच ॲपमध्ये पंतप्रधान आपत्ती मदत निधी देण्यासाठी देखील संबंधित बँक व त्या बँकेचा आयएफसी कोड देण्यात आला आहे.   

लढाईत सामील व्हावे
भारत सरकारने आठ दिवसांपूर्वी आरोग्य सेतु नावाने ॲप लॉन्च केला आहे. मी सुद्धा हा ॲप डाऊनलोड केला आहे. प्रत्येक नागरिकांनी हा ॲप डाऊनलोड करुन ‘कोरोना’ला रोखण्यासाठी भारतीय नागरिक म्हणून लढाईत सामील व्हावे.
- डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com