हृदयविकाराच्या रुग्णाला मिळाला बेड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला अँजिओग्राफीनंतर दोनच दिवसांत "आयसीसीयू'तून इतर वॉर्डात शिफ्ट केले. त्या ठिकाणी त्याच्यावर जमिनीवर उपचार सुरू असल्याची पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल होताच वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी रुग्णाची भेट घेत त्याला आलेल्या समस्या जाणून घेतल्या आणि बेड उपलब्ध करून दिला. लवकरच या रुग्णावर बायपास सर्जरी करण्यात येणार आहे. 

देविदास काकडे (वय 45) यांना बुधवारी छातीत दुखत असल्याने घाटीत दाखल करण्यात आले. शनिवारी (ता. चार) त्यांची अँजिओग्राफी केल्यानंतर तीन ब्लॉक दाखविण्यात आले. शिवाय बायपास सर्जरी करण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. "आयसीयू'मधील उपचार झाल्यानंतर शनिवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास त्यांना वॉर्ड क्रमांक आठ-नऊमध्ये हलवण्यात आले. त्यावेळी बेड उपलब्ध न झाल्याने त्यांना काही वेळ जमिनीवर गादी टाकून उपचार देण्यात आले. त्याविषयी त्यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाची पोस्ट रविवारी व्हायरल झाली. त्याची दखल घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनवणे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख सरफराज यांनी काकडे यांची भेट घेत विचारपूस केली. दरम्यान, त्यांना तत्काळ बेडही उपलब्ध करून दिल्याची माहिती काकडे यांनी दिली. शिवाय दोन दिवसांमध्ये बायपास सर्जरी करण्याच्या हालचाली घाटी प्रशासनाने सुरू केल्या आहेत; तर डॉ. सरफराज हे त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवून आहेत. 

Web Title: heart patients get bed