Heat Stroke : आला उन्हाळा लहानासह मोठ्यानीही तब्येत सांभाळा!

फुलंब्री, उष्माघाताचा त्रास वाढला : दुपारी बाहेर जाणे टाळावे
heat wave health precautions update health department guideline heat stroke
heat wave health precautions update health department guideline heat strokeSakal

फुलंब्री : फुलंब्री तालुक्यात तापमानाचा पारा वाढला असून सुमारे ३६ डिग्री सेल्सिअसवर तापमान गेल्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांनाही उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत बाहेर जाणे टाळावे असा सल्ला आरोग्य विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

फुलंब्री तालुक्यात मार्च महिन्यातच कडक उन्हाळा जाणवू लागला असून दुपारी अंगाची लाही लाही होताना दिसून येत आहे. त्यामुळे दुपारच्या सत्रात नागरिकांनी बाहेर जाणे टाळायला पाहिजे असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.

महत्त्वाची असणारी कामे सकाळी सात ते अकरा पर्यंत उरकून घ्यावीत. तसेच दुपारनंतर चार ते सात पर्यंत कामे करावीत असे आवाहन आरोग्य विभागाकडून दिले जात आहे. सातत्याने होणाऱ्या उष्माघाताचा त्रास लहान मुलासह नागरिकांना होऊ लागल्यामुळे उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जाऊ लागला आहे.

दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शक्यतो सावलीत असणारी कामेच करावे. दुपारी चार नंतर बाहेर जावे जेणेकरून उष्माघाताचा त्रास नागरिकांना होणार नाही. दिवसेंदिवस कडक उन्हाळा जाणू लागल्याने नागरिकांनी उष्णघाताच्या त्रासापासून वाचविण्यासाठी आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

• उष्माघाताची लक्षणे •

* थकवा येणे

* त्वचा कोरडी होणे

* निरुत्साही वाटणे

* भरपूर घाम येणे

* भूक न लागणे

* चक्कर येणे

* ताप येणे

* रक्तदाब वाढणे

* बेशुद्ध होणे

• अशी घ्या काळजी •

* दुपारी १२ ते ४ उन्हात जाणे टाळावे.

* उष्णतेच्या जवळील कामे टाळावीत.

* घट्ट व जाड कपडे घालणे टाळा.

* सैल व फिकट, पांढरी कपडे वापरा.

* पाणी, तरल पदार्थ भरपूर घ्या.

* चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स टाळा.

* उन्हात जाताना टोपी, गॉगल वापरा.

* पार्किंग चारचाकीत मुलांना ठेऊ नका.

* घराबाहेर अनवाणी चालू नका.

* जलसंजिवनीचा वापर करावा.

• लक्षणे जाणवल्यास तातडीच्या उपाययोजना •

* ताबडतोब रुग्णास सावलीत व पंख्याखाली झोपवावे.

* थंड पाणी भरपूर प्रमाणात पिण्यास द्या.

* रुग्णाच्या सभोवतालची गर्दी टाळा.

* तातडीने उपचारासाठी दवाखान्यामध्ये दाखल करा.

* जवळील आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयातील दवाखान्याशी संपर्क करा.

नागरिकांनी सकाळच्या व सायंकाळच्या सत्रातच आपापली दैनंदिन कामे करावी. दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर निघू नये. दुपारी उन्हात कामे करण्याची टाळावी. पांढरे सुती कपडे घालावे, गडद कपडे घालने टाळावे. आपल्या घरातील लहान मुले वयोवृद्धांची विशेष काळजी घ्यावी.

- डॉ.अभिजीत खंदारे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय फुलंब्री

लहान मुलांना शुद्ध व भरपूर पाणी पिण्यासाठी द्यावे. शक्यतो सकाळी 11 ते दुपारी चार वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे. जास्तीत जास्त फळे आणि हिरव्या पालेभाज्या खाण्याला प्राधान्य द्यावे. बाहेर उन्हात जायचे काम पडल्यास डोक्याला पाण्याने भिजलेला रुमाल बांधून प्रवास करावा. जेणेकरून लहान मुलांना उष्मघाताचा त्रास होणार नाही.

- डॉ.योगेश गोरे, नवजात शिशू व बालरोग तज्ञ फुलंब्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com