Chh. Sambhajinagar : गेवराई मर्दाला जोरदार पाऊस व चक्रीवादळाचा तडाखा, अनेकांची पञे उडाली, पाच जण जखमी

गेवराई मर्दा ता. पैठण येथे मंगळवारी (ता.१६) रोजी राञी साडे दहा वाजेच्या सुमारास जोरदार पावसासह चक्रीवादळ आल्याने येथील अनेक घरावरील पञे उडाली असुन घरात ठेवलेली ज्वारी, बाजरी, गहु, तुर हि धान्य भिजली आहे.
heavy rain and cyclonic storm at paithan roof damage 5 person injured
heavy rain and cyclonic storm at paithan roof damage 5 person injuredSakal

आडुळ : गेवराई मर्दा ता. पैठण येथे मंगळवारी (ता.१६) रोजी राञी साडे दहा वाजेच्या सुमारास जोरदार पावसासह चक्रीवादळ आल्याने येथील अनेक घरावरील पञे उडाली असुन घरात ठेवलेली ज्वारी, बाजरी, गहु, तुर हि धान्य भिजली आहे.

अचानक आलेले या वादळाने अनेकांची संसार उघाड्यावर आली आहे. राञीची वेळ असल्याने ज्यावेळी घरावरील पञे उडाली त्यावेळी अनेक जण घरातच होती त्यामुळे पञ्यांवर ठेवलेली दगड त्यांच्या अंगावर पडल्याने पाच जण जखमी झाले.

मंगळवारी (ता.१६) रोजी राञी साडे दहा वाजेच्या सुमारास गेवराई मर्दा ता. पैठण येथे एक तासभर जोरदार पावसासह चक्री वादळासह वारा सुटल्याने येथील हुजुर इब्राहिम पठाण, जगन बापुराव ढाकणे, राजु जायभाये, तिरसिंग दहिफळे सह अनेकांच्या घरावरील पञे उडाली.

यात शहारुख हुजुर पठाण वय २७ वर्षे, फारुख हुजुर पठाण वय २८ वर्षे, सुमय्या हुजुर पठाण वय ३० वर्षे, शिवाजी जगन ढाकणे वय २७ वर्षे सर्व राहणार गेवराई मर्दा ता. पैठण, ईद मिलन कार्यक्रमासाठी आलेले हुजुर पठाण यांचे जावाई इसुफ कारभारी पटेल वय ३३ वर्षे राहणार मोडेगाव ता. घनसावंगी हे जखमी झाले तर इतर ही अनेक जण किरकोड जखमी झाले आहेत.

काल आलेल्या वादळात आमच्या गावातील अनेक घरावरील पञे उडाल्याने त्यांची घरे उध्दवस्त झाली आहे त्यामुळे त्यांचे कुटुंब उघाड्यावर आले असुन महसुल विभागाने तात्काळ सदरील घटनेचे पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना अर्थिक मदत करुन दिलासा द्यावा.

-विक्रम जायभाये सरपंच, कडेठाण खुर्द/गेवराई मर्दा ग्रुप ग्राम पंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com