esakal | हिंगोलीत अतिवृष्टीने ११० किमी रस्त्याची दुरवस्था, पुल धोकादायक | Hingoli Rain
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्याची दुरवस्था.

हिंगोलीत अतिवृष्टीने ११० किमी रस्त्याची दुरवस्था, पुल धोकादायक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात सप्टेंबर महिनाअखेर झालेल्या अतिवृष्टीने शेतीच्या पिका बरोबरच रस्तेही उखडून गेले आहेत. जिल्ह्यात जवळपास ११० किलोमीटर रस्त्याची व ५० नळकांडी पूलाची काही प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तर तीन मोठे पूल धोकादायक झाले आहेत.जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते व पूलाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे २० कोटी ५१ लाख रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता डी.जी.पोतरे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील गुंडा, माथा व नांदापूर येथील तीन मोठे पूल अधिक धोकादायक झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन या तिन्ही पुलांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. शासन स्तरावरून निधी प्राप्त झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे (Rain In Hingoli) खराब झालेल्या रस्त्याची तसेच तीन मोठ्या पुलाची तात्काळ दुरूस्ती केली जाणार आहे.

हेही वाचा: नांदेड : निष्ठावान शिवसैनिक कोरोनाने हिरावला, लोहा शहरावर शोककळा

त्यासाठी शासनाकडे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पावसामुळे रस्त्याचे देखील नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा सर्व रस्त्याची नुकतीच पाहणी केली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याची दुरावस्था झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच बरोबर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रस्त्याचीही दूरावस्था झाली आहे.

loading image
go to top