esakal | परभणीत पावसाचा कहर! पुरात अडकलेल्या बारा जणांची सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

परभणीत पावसाचा रविवारी रात्री कहर

परभणीत पावसाचा कहर! पुरात अडकलेल्या बारा जणांची सुटका

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : परभणीसह Parbhani जिल्ह्यातील तालुक्यात रविवारी (ता.११) झालेल्या अतिवृष्टीने Heavy Rain सर्वत्र हाहाकार उडवून दिला. यामुळे परभणी शहराची दाणादाण उडाली असून घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली. तसेच दुकांनामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परभणीत रविवारी दुपारपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. तो रात्री ९ पर्यंत सुरुच होता. तब्बल सात तास झालेल्या या पावसाने परभणी शहराची Rain In Parbhani दाणादाण उडवून दिली. मुख्य वस्तीतील नारायणचाळ ते आर.आर.टॉवर्स, अष्टभुजा चौक, गुजरी बाजार, क्रांती चौक, गांधी पार्क, सुभाष रोड, शिवाजी रोड, कच्ची बाजार, जनता मार्केट आदी भागातील तळमजल्यावर असलेल्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. त्यामुळे त्यातील कोट्यावधी रुपये किमतीचा माल पाण्याने भिजला.parbhani rain updates heavy rain hit city, stranded 12 people in flood shifted safe place

हेही वाचा: Hingoli Rain Updates : हिंगोल जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पाऊस

परभणी महानगरपालिका Parbhani Municipal Corporation कर्मचारी, अग्निशमन दल यांनी तळमजल्यावरील ठिकठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्या करिता मदत कार्य सुरू केले होते. परभणी ते मानवत या राष्ट्रीय महामार्गावर दोन पुलाच्या ठिकाणीचे वळण रस्ते संततधार पावसाने रविवारी वाहून गेल्यानंतर वाहतूक बंद झाली. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकला नाही. संत गाडगेबाबा नगरातील रहिवाशांना पालिका प्रशासनाने रविवारी रात्री जवळील सुरक्षितस्थळी हलविले आहे. उपमहापौर भगवान वाघमारे, रविंद्र सोनकांबळे, रितेश जैन यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना मंगल कार्यालयात हलविले आहे.

हेही वाचा: नोकरी सोडून रमले ‘कास्टिंग ज्वेलरी’त, तरुणांच्या प्रयत्नांना यश

पूरात अडकलेल्यांची सुटका

परभणी तालुक्यातील मिरखेलजवळ पुरात अडकलेल्या १२ जण, दहा बकऱ्या यांची जिल्हा प्रशासनाने मध्यरात्री सुटका केली. उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, सहायक पोलिस निरीक्षक श्री. बनसोडे, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी पवन खांडके, मंडळ अधिकारी पक्वान्ने, अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलिस कर्मचारी यांच्यासह स्थानिकांनी त्या सर्वांना सुखरूपपणे बोटीने बाहेर काढले.

loading image